
टाकळीभान येथील महादेव मंदीराला कलर देण्याच्या कामाचा शुभारंभ
दि.३१ जानेवारी रोजी करण्यात आला. या कामास भाविकांनी देणगीच्या माध्यमातून रूपाने मदत करावी असे आवाहन महादेव मंदीर यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रशासकीय ही यात्रा रद्द करण्यात आली होती. या मंदीराला रंगरंगोटी करण्याचा निर्णय यात्रा कमिटीसह टाकळीभान ग्रामस्थांनी बैठकीत घेतला. त्यानूसार वर्गणी जमा करून त्यातून कलर कामाचा शुभारंभ दि.३१ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आला. या कामासाठीभाविकांनी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, बाबासाहेब बनकर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, भाऊसाहेब मगर, आण्णासाहेब दाभाडे, अमोल पटारे, विशाल पटारे, सुभाष पटारे, सुरेश पवार, गजानन कोकणे, रंगनाथ कोकणे, भाऊसाहेब कोकणे, बापूसाहेब शिंदे, मोहन रणनवरे, काका डिके, राजेंद्र देवळालकर, पांडू मगर, सुनिल बोडखे, बंडू बोडखे, बाबासाहेब तनपुरे, सुदाम देवळालकर, पुजारी ओंकार जंगम यात्राकमिटी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते
Rate this post