रासायनिकच्या अति वापराने खराब झालेल्या जमीनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळा- माजी मंत्री विखे पाटील

रासायनिकच्या अति वापराने खराब झालेल्या जमीनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळा- माजी मंत्री विखे पाटील
– रासायनिकच्या अति वापरामुळे शेत जमीनीचा पोत खराब होत चालला असुन नापीक होत चाललेल्या जमीनी सुपीक होण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी व्याक्त केले बेलापुर तालुका श्रीरामपुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या साँईल चार्जर टेक्नाँलाँजी या सेंद्रिय खत व वैदीक औषधाच्या दुकानास आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी भेट दिली त्या वेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की रासायनिक औषधाचा वापर वाढला आहे जमीनी नापीक होत चालल्या आहेत तसेच रासायनिक फवारणी केलेल्या शेतमालामुळे आपले आरोग्य देखील बिघडले आहे जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिकचा वापर वाढत चालला आहे
कसदार व विषमूक्त अन्न पिकविणे आता गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची कास धरावी असे अवाहनही आमदार विखे पा .यांनी केले आहे या वेळी जि प सदस्य शरद नवले माजी सभापती दिपक पटारे माजी सभापती नानासाहेब पवार संचालक मुक्ताजी पटांगरे सुधीर नवले राधाकृष्ण आहेर कैलास बोर्डे उपसभापती नितीन भागडे उपसभापती तोरणे नाना शिंदे गिरीधर आसने विश्वनाथ मुठे डाँक्टर आसने भास्कर कोळसे अकबर टिन मेकरवाले आदिसह नागरीक उपस्थित होते पत्रकार देविदास देसाई यांनी आभार मानले