हा सुख सोळा स्वर्गी नव्हे.. तो आळंदीत रंगणार. जगद्गुरु तुकोबाराय येतायेत

हा सुख सोळा स्वर्गी नव्हे..
तो आळंदीत रंगणार. जगद्गुरु तुकोबाराय येतायेत
आळंदी/संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास जागतिक महत्त्व आहे.परदेशातील नागरिकही यासाठी येत असतात.हा सोहळा अनुभवता.वैष्णवांचा मेळा भरतो..तो महाराष्ट्रातल्या आळंदीमध्ये.,याची जगावर पताका लागलेली आहे. !! या रे या नर नारी ..या रे या रे लहान थोर.!! माऊलींच्या या जगासाठी पसायदान मागण्याचं महत्त्व भारत देशाला नव्हे तर जगाला कळले.त्या अनुषंगाने पालखी सोहळा वारी होत असते.सन १६८५ साली श्री संत तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव तपोनीधीनारायण यांनी हा आषाढी पालखी सोहळा सुरू केला.जगद्गुरु संत तुकोबाराय आळंदीहून पंढरीला जात असत तसेच तुकोबारायांची धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण यांनी आषाढी पालखी सोहळा सन १६८५ साली सुरू करताना आळंदीतून दर्शन घेऊन तसेच पंढरीतून पुन्हा परतीचा प्रवास आळंदीतून दर्शन घेत देहू कडे करत असत. त्यांच्या या कार्याला खंड पडला.मात्र धार्मिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने अनोखा योग साधून आणला आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माचे ७५० वे वर्ष तसेच जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या सदैव वैकुंठ गमनाचे ३७५ वे वर्ष. हा दुग्ध शर्करा योग साधत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीला वैद्य दशमीच्या दिवशी दिनांक २०/०७/२०२५ रविवार रोजी आषाढी वारी परतीसाठी मुक्कामी आळंदी नगरीस बोलवले. हा सर्व पौराणिक इतिहासाचा आधार घेत मोरे मंडळींनी आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार केला. आणि आता हा दुग्ध शर्करा योग साजरे करण्याचे भाग्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी सर्व विश्वस्तांना पर्यायाने आळंदीकर ग्रामस्थांना लाभले.यामध्ये संत तुकोबारायांची पालखी आळंदी मध्ये मुक्कामी येणार आणि स्वर्गाहुनी देव करतात पुष्पवृष्टी हा सुख सोहळा स्वर्गी नव्हे. तो आळंदीत दिसून येणार आहे. आळंदीकरांच्या भाग्यमध्ये या दोन संतांची मांदियाळी श्री तीर्थक्षेत्र अलंकापुरी मध्ये पहावयास मिळणार आहे.वारकरी प्रथा परंपरेनुसार तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करावे.असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने केले आहे. नवीन विश्वस्तांच्या माध्यमातून संस्थान कमिटीच्या विविध स्वरूपात माऊलींच्या आशीर्वादाने ७५० वा जन्म शताब्दी सोहळा उत्साह पूर्ण वातावरणामध्ये.,कधी नव्हे तो अलंकापुरी मनोभावे पाहत आहे.आणि पुण्य प्राप्त करून घेत आहे.दरम्यान सर्व समस्त मोरे वंशज मंडळी यांनी आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार करत आम्ही येत आहोत असा सांगावा आळंदीकर माऊलींच्या भाविक भक्तांना पाठवला आहे.आणि स्वागतासाठी आळंदीकर आतुरले आहेत. अशी अवस्था आळंदीत झाल्याने स्वर्ग रूप जल्लोषाचे कारण आळंदी होणार असल्याचे दिसून येत आहे.


