पाचुंदा सोसायटीची निवडणूक रंगतदार, अध्यक्षपदी माणिकराव होंडे उपाध्यक्षपदी नारायण वाघमोडे.

पाचुंदा सोसायटीची निवडणूक रंगतदार, अध्यक्षपदी माणिकराव होंडे उपाध्यक्षपदी नारायण वाघमोडे.
नेवासा तालुक्यातील पाचुंदा सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली त्याचा हनुमान ग्रामविकास पॅनल ने दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम देवळालीकर व घोडके यांच्या उपस्थितीत अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना भरत होंडे यांनी मांडली एकनाथ होंडे यांनी अनुमोदन दिल्यावर सर्वानुमते अध्यक्ष म्हणून माणिकराव होंडे यांची व उपाध्यक्ष पदासाठी नारायण वाघमोडे यांच्या नावाची सूचना डॉ. अनिल होंडे यांनी मांडली त्यास सय्यद उस्मान कासम यांनी अनुमोदन दिल्यावर सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी पर्यंत या कामी विश्वनाथ होंडे, अशोक रामभाऊ होंडे, सखाराम होंडे, सुभाष होंडे, गणेश भाऊसाहेब होंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी माजी सरपंच कारभारी टकले, अविनाश वाघमोडे, मोहन चोपडे, अशोक रामभाऊ होंडे नवनिर्वाचित संचालक भरत होंडे, अनिल होंडे, उस्मान सय्यद, एकनाथ होंडे, अबाजी कोकरे, भाऊसाहेब होडगर, चंद्रकांत वैरागर, देविदास वाघमारे, आजिनाथ होंडे, सौ शांताबाई भाऊसाहेब होंडे, सौ उषा बाबासाहेब होंडे सचिव बि.के. होंडे, क्लार्क बी के माने, एस आर होंडे तसेच ग्रामस्थ विश्वनाथ होंडे, भाऊसाहेब भिमाजी होंडे, सुखदेव होंडे, सुभाष होंडे, म्हातारदेव वाघमोडे, खंडेश्वर वाघमोडे, उमाजी होंडे, रोहिदास होंडे संभाजी होंडे, वाघमारे गुरुजी, शंकर वाघमोडे, राजधर होंडे, सोपान पांढरे, महादेव झेबाजी वाघमोडे, माडजी होडगर, रभाजी लक्षिमन होंडे, दादाभाऊ माधव पठारे, मल्हारी चोपडे, रमेश कोकरे, तुकाराम खरात, सय्यद जमादार, लाजरस शिंदे, पोपट घोरपडे, गोरख पठारे भारत मल्हारी वाघमोडे, संदीप जमादार, पत्रकार उमेश हंडाळ, भिसे दादा आदी ग्रामस्थ उपस्थित होते