नोकरी
शांततेत उत्सव साजरे करून नियमांचे पालन करावे… पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे

शांततेत उत्सव साजरे करून नियमांचे पालन करावे… पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे
टाकळीभान येथील शांतता कमिटी मध्ये बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी सांगितले,यामध्ये त्यांनी ध्वनी क्षेपका बद्दल नागरिकांना नियमावली सांगितली यामध्ये साउंड बॉक्स प्रकारचे स्पीकर नागरिकांनी वापरावे डीजे डॉल्बीचा वापर करू नये व दिलेल्या मुदतीत च वापरावे, दिलेल्या कालावधी तच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. स्पीकरवर कोणत्याही स्वरूपात जातिवाद आस प्रोत्साहन देणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य करू नये, बिभस गाणी लावू नये, सांस्कृतिक व इतर कर्मचारी कार्यक्रमाची परवानगी घ्यावी तसेच ध्वनीशेपका बाबत कोणी तक्रार केल्यास बंद करावा लागेल तसेच पोलीस प्रशासनाने बजावल्या नंतर बंद करावा लागेल. तसेच पोलीस प्रशासनाच्या परवानगी शिवाय ध्वनिक्षेपकची जागा बदलू नये, तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच नागरिकांनीही ग्रामसुरक्षा दल व स्वयंसेवकांची मदत घेऊन उत्सवांमध्ये त्यांचे सहकार्य घ्यावे. असे खाडे म्हणाले. या शांतता कमिटी बैठकी प्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे,मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षष मयूर पटारे ,मौलाना भाईसाहब मामा, , राधाकृष्ण वाघुले,आबासाहेब रणनवरे, भैय्या पठाण, देशमुख भाई, जयकरराव मगर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, शंकरराव पवार, दत्तात्रय नाईक, विशाल पटारे, भरत जाधव, मोहन रणनवरे, महेंद्र संत, अजित बोडखे, सुंदर रणनवरे, दिगंबर मगर ,अनिल कांबळे, माळोदे मामा, सागर पठाडे, शिवा साठे, पप्पू रणनवरे, पो. शेंगाळे दादा, पवार दादा, बाबा सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचे आभार मा. उपसरपंच पाराजी पटारे यांनी मानले.