
गावरान गाई चोरीच्या प्रकारात वाढ, गोपालक धास्तावला.
हिंदु धर्मात सर्वात पविञ मानली जाणारी गावरान गाईंची संख्या झपाट्याने कमी होत आसली तरी धार्मिक परंपरा जपण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या गावरान गाईंवर चोरट्यांची वक्र दृष्टी पडत आसल्याने गावरान गाई चोरीच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे.
टाकळीभान येथे बसस्थानक परीसरात कांताबाई आसाराम आरगडे या वास्तव्यास आहेत. गेल्या १५ वर्षांपासुन त्यांनी पांढऱ्या रंगाच्या एका गावरान गाईचे संगोपन केले आहे. भर वस्तीत त्यांच्या दारासमोरच ही कपिला गाय बांधलेली आसल्याने ती कपिला सर्वपरीचित होती, अनेक नागरीक या गोंडस गाईला पुण्यकर्म लाभावे म्हणुन घास मका खायला देत असत. तर सणासुदिचे अनेक नैवद्य महीला या कपिला गाईलाच देत असत. त्यामुळे कपिला तब्बेतीने धडधाकट होती. गेली अनेक वर्षे ती आरगडे कुटुंबाला दुधही देत होती. माञ सोमवारची राञ त्या कपिला गाईसाठी कर्दनकाळ ठरली. चोरट्यांची वक्रदृष्टी कपिला गाईवर पडली आणि सोमवारी राञी आंदाजे दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी आंगणात बांधलेली कपिला चोरुन नेली. नेहमी माणुस जवळ आल्यावर हंबरडा फोडणारी कपिलाही हंबरडा फोडण्यास विसरली. कदाचित कपिलेने फोडलेल्या हंबरड्यामुळे पाच फुटाच्या अंतरावर घरात झोपलेले आरगडे कुटुंब जागे झाले असते माञ चोरटे दोर तोडुन कपिलेला घेवुन गेले तरी तीने हंबरडा फोडलाच नाही.
सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे कांताबाई झोपेतुन उठुन घराच्या बाहेर आल्या माञ त्यांना कपिला खुट्यावर न दिसल्याने त्यांनी कुटुंबाला जागे केले. बारकाईने पाहीले असता कपिला ज्या सुताच्या दोरीने खुटीला बांधले होते तो दोर धारदार हत्यारानृ कापल्याचे दिसुन आल्यानेकपिला चोरट्यांनीच चोरुन नेल्याची खाञी पटली. यापुर्वीही टाकळीभान आणि भोकर शिवारात गावरान गायांची चोरी झालेली आहे. परीसरातही गावरान गाय चोरी गेल्याची माहीती या प्रकारानंतर परीसरातील नागरीकांनी या घटनेच्या निमित्ताने दिली. टाकळीभान दुरक्षेञाचे पो.हे.काँ. रविंद्र पवार व पोलिस सहाय्यक बाबा सय्यद यांनी सकाळी ६ वाजताच घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. आरगडे कुटुंबाला गेली १५ वर्षे लळा लागलेली कपिला चोरीस गेल्याने आरगडे कुटुंबालाआस्रु आनावर झाले होते.
Rate this post