येथे विविध ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी…

येथे विविध ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी…
टाकळीभान येथे विविध ठिकाणी संत गाडगे महाराज जयंती साजरी, ग्रामपंचायत,प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अण्णासाहेब पा. पटारे जुनियर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे ग्राम स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले व जयंती साजरी करण्यात आली. यावेळी न्यू स्कूल टाकळीभान येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील साफसफाई कचरा गोळा करून संत गाडगे महाराज यांच्या ग्रामस्वच्छते च्या कार्याला प्रोत्साहन व प्रेरणा दिली… टाकळीभान ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच पती यशवंत रणनवरे , उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्राम. सदस्य मयूर पटारे, राजेंद्र कोकणे ,सुनील बोडखे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, ग्रामसेवक आर एफ जाधव, ग्राम सदस्य सुंदर रणनवरे, शिवाजी पवार ,बंडोपंत बोडखे, बद्रीनाथ पटारे, तर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी डॉ. राजश्री देशमुख तालुका वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे , अर्जुन राऊत, आबासाहेब रणनवरे, मोहन रणनवरे ,महेंद्र संत,सिस्टर, भोसले सिस्टर ,श्रीम.धनिष्ठ्ठा पागीरे ,श्री.कुंभार सर, आरोग्य सहाय्यक समद भाई शेख, नवनाथ विटनोर, प्रशांत तराळ, आशा सेविका सीमा ताई साळवे, शैलाताई भोसले, सुनीताताई रणनवरे, मंगल खरात, मीना साळवे, संगीता शिरसाठ, अभिनव नागले, प्रमोदिनी घाडगे, तर न्यू इंग्लिश स्कूल अण्णासाहेब पा.पटारे या ठिकाणी प्राचार्य मरभळ, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.