कचरा वेचणाऱ्या गरीब महिलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर कारवाई करावी- सागर बेग

कचरा वेचणाऱ्या गरीब महिलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर कारवाई करावी- सागर बेग
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- अहील्यानगर शहरातील कॉटेज कॉर्नर याठिकाणी कचरा वेचणाऱ्या गरीब महिलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोरातील कठोर कलमे लावून पोलिसांनी कडक शासन करावे अन्यथा राष्ट्रीय श्रीराम संघ मोठ्याप्रमाणात आवाज उठवून अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देईल असा ईशारा सागर बेग यांनी दिला आहे.*
अहील्यानगर जिल्ह्यात जिहादी प्रवृत्ती कडून हल्ले वाढले असून शाळकरी मुलींची छेडछाड करने,अल्पवयीन मुलींना लव जिहाद सारख्या घाणेरड्या प्रकारात फसवून त्यांचे धर्मांतर करने,निष्पाप लोकांवर सुऱ्याचे वार करण्यासारखे प्रकार तर जिल्ह्यात नित्याचेच होऊन बसले असून हे सर्व प्रकारात जिहादी प्रवृत्तीचे लोकांचा जास्त समावेश असल्याने तो एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे.आता तर त्यातून महिलाही सुटलेल्या नाहीत.काही दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरात कॉटेज कॉर्नर याठिकाणी कचरा वेचून स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिलांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी काही एक कारण नसतांना अमानुषपणे मारहाण करत जबर जखमी केले आहे.लोकशाहीला काळीमा फासणारी इतकी मोठी घटना घडूनही पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जिहादी लोकांना एकप्रकारे गुन्हा करण्याची मोकळीक दिल्यासारखे कृत्य केले आहे.त्या घटनेचा निषेध नोदवण्यासाठी व रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलांना धीर देत त्या पिडीत महिलांना राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने आर्थिक मदतीचा हातही दिला आहे.राष्ट्रीय श्रीराम संघ त्या भगिनींच्या पाठीशी असल्याचा संदेश जीहाद्यांपर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी अहील्यांनगर येथे रुग्णालयात जावून महिला भगिनींना धीर दिला.
याप्रसंगी बोलतांना सागर बेग यांनी पोलीस प्रशासनास धारेवर धरत जिहादी लोक या गंभीर गुन्ह्यातून सहीसलामत बाहेर पडतील असे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंदवल्या बद्दल त्यांच्या तपासकार्याचा निषेध केला.अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी देखील याप्रकरणी विशेष लक्ष दिले असून पोलिसांना कठोरातील कठोर कलमे लावून आरोपींवर मागासवर्गीय अन्याय कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिलेल्या असतांनाही पोलीस जिहादीच्या बाजूने झुकत देत असतील तर आंदोलन करूनच पोलिसांना ठिकाणावर आणावे लागेल असा इशारा याप्रसंगी सागर बेग यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यात हिंदूंवर जीहाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून तो एक चिंतेचा विषय आहे.राज्यात हिंदुत्ववादी शासन असूनही या जिहादी प्रवृत्त्या कायद्याला जुमानत नसतील तर गेल्या सत्तर वर्षात हिंदूंवर किती अनन्वित अत्याचार झाले असतील त्याबाबत विचार सुद्धा करवत नाही आणि ते जनतेसमोर देखील तेंव्हा आलेले नाही.याबाबत विचार करून हिंदूंनी आज एकजूट होण्याचे आवाहन देखील सागर बेग यांनी याप्रसंगी केले आहे.