प्रधानमंत्री व महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा .भानुदास मुरकुटे..

प्रधानमंत्री व महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा .भानुदास मुरकुटे..
प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाईफ लाईन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल राहुरी, व जगदंबा युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ अण्णासाहेब चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थांनचे विश्वस्त सचिन गुजर, नीरज मुरकुटे उपस्थित होते.
या वेळी बोलताना मुरकुटे म्हणाले की या शासनाच्या आरोग्याच्या योजना मोफत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा व आधार देणाऱ्या आहेत. दिवसेंदिवस आरोग्याचा खर्च वाढता असून तो इतरत्र सामान्य नागरिकांना परवडणारा नाही या शिबिरामध्ये आरोग्य योजना सर्वच नागरिकांसाठी उपलब्ध असून आरोग्याच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असून आपल्या आजारावर या हॉस्पिटलमार्फत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच येथील डॉक्टर आठवड्याच्या सोमवारी नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी येणार आहेत.उपसरपंच महेश पटारे व गणेश छल्लारे यांच्यामार्फत ही सेवा देण्याचे काम ते नागरिकांना करत आहे ही त्यांच्या उत्तम कार्याची कौतुक केले,
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने म्हणाले की माणसाला आपले पुढील आयुष्य सुखकारक जगता यावे यासाठी आरोग्याच्या शरीराच्या तपासण्या करणे आवश्यक आहे, तपासण्या केल्यास वेळीच जागरूक होऊन आपल्याला उपायोजना करता येतात असे ते म्हणाले. यावेळी शिर्डी संस्थांन चे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की गणेश छल्लारे मित्र मंडळाने पाच ते सहा गावांमध्ये साडेतीन हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला असून यामध्ये मध्यान भोजन योजना, विविध आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करून मोठे काम केले असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी डॉक्टर ऋषी कवडे यांनी शिबिरा बद्दल माहिती देऊन ही आरोग्य सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानले. शिबिरामध्ये 400 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी होऊन 250 नागरिकांना चष्म्याचे यावेळी वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते 100 नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले व बांधकाम कामगारांना 50 पेट्या साहित्यासह वितरित करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये बांधकाम कामगारांसाठी मच्छरदानी, जेवणाचा डबा, बॅटरी, बूट सेफ्टी किट, चटई, रेनकोट, हेल्मेट आदी साहित्य होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच महेश पटारे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शिबिरासाठी आरोग्य सेवा देणारे डॉ. शुभम माने, ,डॉ. किशोर कवडे, डॉ. तेजस हिवाळे ,डॉ. दिनेश हेबांडे डॉ. साकीब शेख बाळासाहेब विधाटे,भोकर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास शिंदे, टाकळीभान बांधकाम कर्मचाऱ्यांचे नेते, प्रताप लोखंडे, गंगाराम गायकवाड ,पंढरीनाथ मते, बाबासाहेब तागड,नानासाहेब जगदाळे,राजेंद्र विधाटे,ठकसेन खंडागळे ,भाऊराव सुडके,निलेश विधाटे,संदिप अमोलिक,भास्कर झिने, बाळासाहेब पटारे,कारभारी तागड,राजेंद्र चोधरी, ऋषिकेश झिने, सुनिल विधाटे,बबन मांजरे, मधुकृर गायकवाड,बबन आहेर,सर्जेराव आहेर आदींसह मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष, शिबिरार्थी नागरिक उपस्थित होते