प्राईडने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाघिणीचे दूध उपलब्ध करून दिले- प्रा.नवनाथ कुताळ

प्राईडने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाघिणीचे दूध उपलब्ध करून दिले- प्रा.नवनाथ कुताळ
प्राईड अकॅडेमीने गणित,विज्ञान प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला आणि उपक्रमशिलतेला वाट मोकळी करून देत प्राईडने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाघिणीचे दूध उपलबद्ध करून दिल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व वात्रटिकाकार प्रा नवनाथ कुताळ यांनी केले आहे.
ते भेर्डापूर वांगी येथे पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांच्या संकल्पनेतून प्राईड अकॅडेमीने आयोजित केलेल्या गणित,विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे होते याप्रसंगी प्रवीण देवकर, राजेंद्र कोकणे, ,प्रताप कवडे, भगीरथ तनपुरे, गणेश धुमाळ, पमोद पवार, विलास कवडे, सुजित भाले, वैभव रासकर, प्राचार्य प्रिती गोटे,टाकळीभान प्राईडचे प्राचार्य पवन घोगरे,प्रा.मिरीकर, वाडेकर आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रा.कुताळ म्हणाले,शहरी भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नव्हते.त्यामुळे विशेषतः मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या.आजकालची परिस्थिती लक्षात घेता पालक मुलींना इतरत्र दूर पाठवायला तयार नाहीत.
प्राईडने मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करून वैज्ञानिक व गणितीय ज्ञानाला चालना मिळणार आहे.दरम्यान विद्यार्थ्यांनी आर.टी.जी.एस. प्रणाली, सिग्नल कार्यप्रणाली, अपघात नियंत्रण, खाजगी वाहने त्याच बरोबर सार्वजनिक वाहने या मधील भेद,पायथागोरस प्रमेय कार्यप्रणाली, बायोगॅस, शेतीविषयक, सोलार सिस्टम,सीसीएस मध्ये पायथन भाषेची पिंग पोंग गेम यांसारखे विविध प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण व त्याचा व्यावहारिक उपयोग यांची माहिती दिली. याचबरोबर व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी खाद्यपदार्थांची विक्री करून विद्यार्थी नफा-तोट्याचे धडे गिरवत होते. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे,पालक व ग्रामस्थ बघून भारावून जात होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका अँना लोखंडे तसेच ज्यू. कॉलेजचे प्राचार्य सुरेश कोकणे यांनी आभार मानले