कृषीवार्ता
वर्ग 2 जमीन धारकांना साठी आनंदाची बातमी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

वर्ग 2 जमीन धारकांना साठी आनंदाची बातमी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील वर्ग दोन च्या जमिनी धारकांसाठी शेती कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकरी संघटनेने जिल्हा बँक येथे गेल्या आठ दिवसापूर्वी अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडचणी संदर्भात पाठपुरावा करून वर्ग दोनची जमीन धारकांवर जो कर्ज मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या दूर करण्यासाठी तसेच वर्ग दोनची जमीन धारकांना कर्जपुरवठा करत असताना जामीनदाराची सक्ती केली होती त्या शक्तीतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला बँकेचे अधिकारी व बँकेचे माननीय चेअरमन साहेब यांच्या बरोबर सदर विषयावर सविस्तर चर्चा करून नाबार्डचे शेतीविषयक धोरण केंद्र शासनाचे किसान क्रेडिट कार्ड संदर्भात राज्य शासनाची व केंद्र शासनाच्या असलेल्या योजनांची पूर्ण माहिती सदर अधिकाऱ्यांपुढे सादर केल्यानंतर या विषयावर संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आठ दिवसापूर्वी देण्यात आले होते आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार बावीस रोजी संचालक मंडळाची बैठक होऊन सदर बैठकीमध्ये वर्ग 2 जमीन धारकांना कर्जपुरवठा करताना कोणत्याही प्रकारच्या जामीनदार देण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असल्याकारणाने आता सर्व वर्ग 2 जमीन धारकांसाठी कर्ज मिळणे सुलभ होणार आहे सदर विषयांमध्ये सातत्याने पाठपुरावा करून एडवोकेट अजित दादा काळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना तसेच जिल्हाध्यक्ष अनिल आवताडे तालुका अध्यक्ष युवराज जगताप व इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सदरचा विषय तडीस गेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत आणि त्यांनी शेतकरी संघटनेचे आभार आणि अभिनंदन केले आहे
Rate this post