टाकळीभान येथे दहीहंडी जल्लोषात…

टाकळीभान येथे दहीहंडी जल्लोषात…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीमान येथे मोठ्या जल्लोषमध्ये दहीहंडी उत्सव साजरा झाला. प्रथमच दहीहंडी उत्सव समितीने सुरेख नियोजन केले होते. संगीत वाद्याच्या तालावर थिरकत तरुण युवक वर्ग यावेळी दहीहंडीसाठी उत्साही होते. व या दहीहंडी उत्साहात सहभागी झाले होते. टाकळीभान चा उंच अशा कमानी मध्ये दहीहंडीच्या दोरीला आकर्षक तिरंगा फुग्यांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे दहीहंडीची शोभा वाढली. त्याचप्रमाणे संविधान ग्रुपने दहीहंडी फोडणाऱ्या ग्रुपला 2100 रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते. त्याप्रमाणे टाकळीभान येथील ओन्ली साई ग्रुपने दुसऱ्यांदा अथक प्रयत्नानंतर दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. यावेळी उंच दहीहंडी मुळे फोडणाऱ्यांची कसरत झाली तर बघणाऱ्यांची करमणूक झाली. यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर, संविधान ग्रुपचे सदस्य व दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने विजेत्या ओन्ली साई ग्रुपला बक्षीस वितरित करण्यात आले. दहीहंडी फोडल्यानंतर तरुण वर्गाने डीजे च्या तालावर नाचत आनंद जल्लोष साजरा केला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरणराव धुमाळ, बबलू वाघुले, मुकुंद हापसे, सुंदर रणनवरे, अक्षय कोकणे, शंकर रणनवरे, सुरेश शिंदे, आप्पासाहेब रणनवरे, अर्जुन भालेराव,अक्षय बनकर, बबलू बनकर, सतीश रणनवरे, बाबा डीजे, गणेश चांडे, महावितरण चे घोळवे साहेब यांनी परिश्रम घेतले.