भैरवनाथ बेलवंडी सहकारी सोसायटी पुन्हा अण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यात…

भैरवनाथ बेलवंडी सहकारी सोसायटी पुन्हा अण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यात…
नागवडेंच्या पॅनल ला सभासदांनी नाकारलं…
संपूर्ण जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूकित अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ सहकार विकास पॅनल ने बाजी मारत सर्व 13 पैकी 13 जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित राखत विरोधी गटाचे पानिपत केले.
भैरवनाथ सोसायटी निवडणूकीसाठी एकूण 2929 मतदारांपैकी 2593 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. नागवडे कारखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी ज्ञानदेव माऊली हिरवे आणि कारखान्याचे संचालक सावता हिरवे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यातून सोसायटी काढून घ्या लागेल ती रसद पुरवण्याची ग्वाही नागवडे यांनी काही दिवसापूर्वी बेलवंडी येथील एका कार्यक्रमात दिली होती.तेव्हापासून शेलार यांनी कंबर कसली होती .सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी आशा काहींना होती परंतु शेलार यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका घेऊन विरोधकांना भुईसपाट करण्याची रणनीती आखली आणि या निवडणुकीत 13 च्या 13 जागा जिंकून विरोधी गटाचे पानिपत करून त्यांना कात्रजचा घाट दाखवला असल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी बोलताना व्यक्त केली.
या निवडणुकीची प्रचाराची धुरा अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार यांनी सांभाळत रोज 150 ते 200 तरुण युवकांना सोबत घेऊन प्रत्येक सभासद व शेतकरी यांच्याशी भेटून सोसायटी च्या पारदर्शक कारभाराचा आलेख सभासदांसमोर मांडला. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने विरिधकांना ऋषीकेश शेलार वर टीका करण्याची वेळ आली.
विरोधकांना नागवडे यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली असली तरी माजी आमदार राहुल जगताप हइ अण्णासाहेब शेलार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले . मोठ्या प्रमाणात अर्थिक रसद पुरुवन देखील सभासदांनी नागवडे गटाच्या किसान क्रांती पॅनल ला नाकारल्याने शेलार यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीत सोसायटी चे माजी चेअरमन दिनेश इथापे, ग्रा.पं. सदस्य डॉ. अशोक शेलार, रामदास लबडे यांचा दारुण पराभव झाल्याने तो जिव्हारी लागला असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये विजयी उमेदवार घोडेकर बापू पांडुरंग,काळाणे विजय अंकुश,लबडे जयसिंग बाजीराव,इथापे शरद बापुराव, हिरवे गंगाराम ज्ञानदेव, डाके आश्रू दत्तू , शेलार ज्ञानदेव विठोबा,लाढाणे सुखदेव राघू,
लबडे स्वाती गोरक्ष,वैद्य अनिता भगवान,साळवे नामदेव भगवान,शेलार साहेबराव लहानू, वाघमोडे संतोष लहानू हे उमेदवार 850 ते 900 च्या फरकाने विजयी झाले आहेत.
सायंकाळी 7 वाजता अधिकृत निकालाची घोषणा सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी केली. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोत्रे यांच्यासह 12 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव मगर यांनी अण्णासाहेब शेलार यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती बाहेरच्या लोकांनी आमच्या गावचा नाश करण्यासाठी विडा उचलला होता,आर्थिक रसद त्यांनी विरोधकांना पुरवली होती, काहींना धमक्या दिल्या गेल्या पण तरी सभासदांनी धनशक्तीला नाकारले आणि बाहेरच्यांना धडा शिकवला आहे इथून पुढे आमच्या नादाला लागले तर याच पद्धतीने उत्तर दिले जाणार.
चौकट – या निवडणुकीत अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार यांनी 150 ते 200 तरुणांची फौज तयार करून घरोघर प्रचार करून जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ऋषिकेश शेलार यांच्या सोबतची तरुणांची सक्रिय यंत्रणा आगामी राजकीय एन्ट्री मानली जात आहे.