राजकिय
वांगी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सौ.प्रभावती ज्ञानेश्वर लकडे यांची बिनविरोध निवड .

वांगी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या मानकरी ठरल्या सौ.प्रभावती ज्ञानेश्वर लकडे .
नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील लक्षवेधी ठरलेली वांगी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक झाली असून यात लोकसेवा विकास आघाडीचे सरपंच पदासाठी १ तसेच सदस्य पदासाठी ७ असे सर्व नव निर्वांचीत उमेदवार निवडून आले असून जनते मधुन सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर बिडगर तसेच उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून या निवड प्रक्रियेसाठी पशुसंवर्धन अधिकारी श्री सानप ग्रामसेवक सौ. बाचकर यांच्या नियंत्रणाखाली सौ. प्रभावती ज्ञानेश्वर लकडे यांची बिनविरोध निवड झाली असून.
या निवडी प्रसंगी जगन्नाथ बिडगर कल्याण लकडे सर म्हळुभाउ उघडे सोमाभाऊ पारखे किशोर कांबळे लहानु बाचकर अण्णासाहेब कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच निवडी प्रसंगी सर्व सदस्य मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.