वांगी खुर्द उपसरपंच पदासाठी श्री सचिन राऊत यांची बिनविरोध निवड.

वांगी खुर्द उपसरपंच पदासाठी श्री सचिन राऊत यांची बिनविरोध निवड.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द ग्रामपंचायत अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदासजी मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सचिन भगतराव यांनी लढविण्याची ठरवली तरी त्यांच्या आदेशाने काम करत असताना श्री राऊत यांना यश देखील आले.
त्यांनी ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा मानस सर्व ग्रामस्थांसमोर मांडला त्या निर्णयाचे स्वागत करत सत्ताधारी पार्टीचे काकासाहेब साळे यांनी मान राखत ग्रामपंचायत सचिन राऊत यांच्या युवा पार्टीच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली.
सरपंच पदासाठी सौ संगीता राजेंद्र कांबळे यांची वर्णी लागली असता आत्ता नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार सौ वाकडे व ग्रामसेवक राजेश तगरे यांच्यासमोर गावचे लाडके व तडफदार नेतृत्व असणारे तरुण सचिन राऊत यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली असून यावेळी नायब तहसीलदार सौ वाकडे ग्रामसेवक राजेश तगरे यांनी काम पाहिले.
या वेळी बाबाजी जगताप बन्सी मेगडे बाबासाहेब गायकवाड खंडू मेकडे भगत राऊत नागेश शिंदे नवनाथ कोपनर दत्तात्रय देवकर ठकाजी राऊत भिमा बर्डे शिवाजी मोरे सर्जेराव गायकवाड राहुल पवार मोहन कोपनर पोपट कोपनर रामभाऊ पवार बाळासाहेब मेकडे विकास शिवरकर रवी जगताप संतोष गायकवाड काकासाहेब लाटे अण्णासाहेब गायकवाड अशोक मेकडे बाळासाहेब मेकडे पोलीस पाटील दिनकर गायकवाड दीपक पवार शिवाजी पिसाळ विष्णू जगताप व सर्व सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.