यावेळी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव फलकाचे, अनावरण ग्रामपंचायत सरपंच अर्चना रणवरे, व ग्रामपंचायत सदस्य अर्चना पवार ,उपसरपंच कानोबा खंडागळे ,यांच्या हस्ते फीत कापून अनावरण करण्यात आले, तसेच ,शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी उपसरपंच कानोबा खंडागळे आपल्या भाषणात म्हणाले, जिल्हा परिषद शाळा इमारत ही अत्यंत जुनी झाली असून ,ती धोकादायक आहे ,त्यामुळे ,बांधा वापरा हस्तांतर करा ,टी ओ टी तत्वावर लवकरच त्याठिकाणी नवीन इमारत उभी करण्यासाठी ,प्रयत्न करू ,त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येईल , खंडागळे म्हणाले,
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, केंद्रप्रमुख सरदार पटेल ,मुख्याध्यापक अनिल कडू, भाऊसाहेब पठारे , तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकाळ, मोहन रणवरे, महेद्रा संत, पांडू मगर, सुंदर रणवरे ,लक्ष्मण जाधव ,शिक्षक कुमार कानडे ,पठारे,शिक्षिका जयश्री चव्हाण ,उर्मिला, मिलके ,संगीता उंडे ,उज्वला पाचारणे ,सुनिता जाधव, वनिता नेहूले ,निशा भोसले , व सर्व पत्रकार उपस्थित होते