अपघात
दुचाकी व चारचाकी चा येथे भीषण अपघात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी.

दुचाकी व चारचाकी चा गढी येथे भीषण अपघात,
एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी.
गेवराई तालुक्यातील गढी जवळील माजलगाव रोड वरती दुचाकी व चार चाकी चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली असून चार जण गंभीर जखमी झालेले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गढी ते माजलगाव या रोडवरती शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास दुचाकी व चारचाकी चा भीषण अपघात झाला.अपघातानंतर दुचाकी व चारचाकी अशा दोन्हीही गाड्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वीजेच्या डिपीला जाऊन धडकल्या.या अपघातामध्ये एक वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे तात्काळ हलविण्यात आले असून रुग्णांवरती उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे उपचार सुरू आहेत.अचानक घडलेल्या या खळबळजनक घटनेने संपूर्ण तालुका हादरून टाकला आहे.या घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.