जगत विख्यात नाथ संप्रदायातील नवनाथांची धर्मनाथ बीज*

*जगत विख्यात नाथ संप्रदायातील नवनाथांची धर्मनाथ बीज*
श्रद्धा आणि भक्ती हि परंपरा निर्माण करत जगाला एक अदभुत शिकवणं नाथ संप्रदायाने दिली . आत्मा ते जीवात्मा हा प्रवास करताना जीवनातील सगळी भव दुःख विसरायची असतील तर अध्यात्मा शिवाय दुसरा मार्ग नाही.आणि सोपा मार्ग सर्व सामान्य माणसाच्या साठी उपलब्ध करून दिला तो नाथ संप्रदायाने ,नाथ संप्रदायाची शिकवण हि जगाचं कल्याण करणारी संजीवनी आहे.सृष्टी वर असणार्या सर्व विघातक शक्ति यांना संजीवन मंत्र शक्तिने प्रतिबंध करत मानवी जीवनातील अनेक सुख दुःखाचा विनाश करत शरिराकडून आत्म्या कडे ,व दुखापासुन मुक्ति कडे मानवी जीवन घेऊन जाताना धर्म मार्ग ने मानवतेची शिकवण जगाला देताना सुख शांती समाधान याच गमक संसारात नाही तर ते अध्यात्म मार्गावर आहे पण कर्म करण क्रमप्राप्त आहे याची आठवण ठेवून विशावाच कल्याण करण्यासाठी समर्पित भावनेने जन उपदेश केलेले महान विभूती जगत विख्यात नाथ संप्रदायातील नवनाथ भक्ति संप्रदायाचे महत्व अलौकिक आहे.जगत विख्यात नाथ संप्रदाय आणि भक्ति परंपरा याचा परिचय आणि प्रत्यय संबंध देशाला आहे .आपल्या हिंदू धर्म संस्कृती नुसार व धर्म ग्रंथानुसार आपल्या काही धार्मिक परंपरा अद्भुत व अद्वितीय आहेत . हे अतिशयोक्ती नसुन ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे. निसर्ग देव, देवता, अदी पुरूष,गाव देवता वन देवता , कुलदैवत, ऋषी मुनी साधु संत महंत महापुरुष,हि आपली दैवतं आहेत . आणि याच परंपरेतील धर्म शास्त्रानुसार व आपल्या संस्कृती प्रमाणे आपण काही विशिष्ट असे सण उत्सव साजरे करतो. दान , धर्म, पुण्य करत ,अठरा विश्व दारिद्र्य संपुष्टात यावं , आणि हातुन पुण्य व्हावं धर्म कार्य साठी आपला हातभार असावा म्हणून महाराष्ट्र राज्य सह देशाच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी नवनाथ संप्रदायातील सद्गुरु धर्म नाथ बीज उत्सव साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वा नंतर माघ महिन्यातील द्वितीय या दिवशी कालयुगाच्या अगदी प्रारंभी नवनाथ संप्रदायातील श्री दत्त गुरु यांच्या कडून अनुग्रह घेऊन सद्गुरु मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य सद्गुरु गोरक्षनाथ यांनी नथ संप्रदायाचे कार्य प्रचार आणि प्रसार करताना सद्गुरु धर्मनाथ यांना अनुग्रह देत असताना एक अनोखा सोहळा साजरा केला आणि हा सोहाळ उत्सव साजरा करताना देव देवतासंह सृष्टी वरील सकल जीवांना निमंत्रित करून खुप मोठा पंचपक्वान्न (भांडार) सोहळा आयोजित केला . आणि यावेळी सर्व देवी देवता यांचा यथोचित सन्मान सत्कार करून खुप मोठा अद्वितीय अलौकिक सोहाळा यशस्वी केला . यावेळी सर्व सिद्धी ह्या स्वतः उपस्थित राहुन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रसन्न होत्या. आणि विशेषता सद्गुरु गोरक्षनाथ यांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद वाढला .या सोहळ्यासाठी सर्व देव देवी देवता बहुसंख्येने उपस्थित होतो . हाच प्रसाद सकल देव देवी देवता यांना प्रचंड आवडला व दरवर्षी ह्याच पद्धतीने याच दिवशी हा प्रसाद मिळाला पाहिजे अशी इच्छा सकल देवता यांनी व्यक्त केली आणि हिच इच्छा एक भव्य दिव्य परंपरा म्हणून आध्यत्मिक धर्म शास्त्रानुसार दरवर्षी नाथ संप्रदायातील गावा गावात खेड्यात पाड्यात अनेक ठिकाणी भक्त गण उत्साहात आजही साजरी करतात . आध्यत्मिक विश्वातील हा ऐतिहासिक दिन आहे.