प्राथमिक शाळा डिजीटल अन्य पद्मश्रींना सलाम अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम

प्राथमिक शाळा डिजीटल अन्य पद्मश्रींना सलाम
अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम
पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांना सलाम करण्यासाठी श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने विज पाणी समस्यांवर मात करुन अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील पोपेरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौर ऊर्जेवर डिजीटल केली यामुळे आदिवासी लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे.
या शाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे यांचे हस्ते करण्यात आले युपीएससी परिक्षेतून यशाचे शिखर करणारा प्रशांत डगळे याच्या आई वडीलांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे होत्या
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने दुर्गम भागातील अहमदनगर जिल्हा परिषदेची पोपेरेवाडी शाळा डिजीटल करुन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना सलाम केला या उपक्रम इतर सामाजिक जाणीवेतून काम संस्थांसाठी प्रेरणादायी आहे अग्नीपंखचा आदर्श घेऊन काम केले इतर प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलेल
मधुकर रहाणे म्हणाले कि भारतरत्न डॉ ए पी जे यांचे प्रेरणेने काम करत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनचे उपक्रम मी आडीच वर्षापासून पाहत आहे हे उपक्रम अधिक प्रभावीपणे उभे राबविण्यासाठी अग्नीपंखच्या मागे उभे राहण्याची गरज आहे
पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या कि, माझा अनेकांनी मान सन्मान केला अग्नीपंख फौंडेशनने आदिवासी कुंटुबांतील लेकरांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी पोपेरेवाडीची शाळा डिजीटल केली अशा कामाची गरज आहे. प्रास्ताविक दिलीप काटे यांनी केले
यावेळी नागवडे साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले गटविकास आर के शेळके
जितीन साठे नवनाथ दरेकर रासदास ठाकर राजकुमार इथापे अरिफ शेख गोपाळ डांगे प्रा संजय लाकुडझोडे बी बी गोरे संजय कडलग सतिश लगड किसन वऱ्हाडे अमोल गव्हाणे शुभांगी लगड मधुकर काळाणे गणेश कविटकर शांताबाई पोपरे दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र पोटे यांनी तर आभार विष्णु भांगरे यांनी मानले.