अल्पवयीन मुलीचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करत व्हिडीओ कॉल करून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करत व्हिडीओ कॉल करून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करत व्हिडीओ कॉल करून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणार्या राहुरी स्टेशन येथील अतिक मुक्तार सय्यद या तरूणांवर राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम(पोस्को), माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला राहुरी पोलीसांनी गजाआड केले आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, माझी मुलगी 17 वर्षे 4 महिने वयाची अल्पवयीन असून ती अज्ञान आहे. सुमारे दिड वर्षापुर्वी तीच्या मोबाईल मध्ये एका अनोळखी तरूणासोबत तीचे अश्लिल फोटो अढळून आले. तसेच अतिक सय्यद याने त्याच्या इन्स्टाग्राम आयडी वरून माझ्या मुलीचे त्यासोबत असलेले फोटा प्रसारीत केले. तसेच तो अधून मधून चोरून लपून माझ्या मुलीला भेटण्यासाठी येऊन तीला ब्लॅकमेल करीत आहे. सदरील आरोपी मुलाने अनेक हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे त्यानुसार पुढील तपास पोलीस करत आहेत
पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अतिक मुक्तार सय्यद याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. 874/2023 भादवी कलम 354 (ड), (2), बालकाचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम-2012 चे कलम-11 (4), 12 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम-2000 चे कलम-67 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.