साठवण तलावास जमीन देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता बेलापूरात आनंदोत्सव साजरा

साठवण तलावास जमीन देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता बेलापूरात आनंदोत्सव साजरा
बेलापूर-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्यास महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य शरद नवले यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य मंञी मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की बेलापूर-ऐनतपूरची १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.या योजनेसाठीच्या साठवण तलावासाठी जागा नव्हती.त्यामुळे सध्याच्या साठवण तलावांच्या लगतचीच शेती महामंडळाची जमिन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.तसेच यासाठी महसूल मंञी नामा.राधाकृष्ण विखे पा.यांचे माध्यमातून जि.प. सदस्य शरद नवले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी सकारात्मक पाठपुरवठा केला होता.अखेरीस त्यांच्या प्रयत्नास यश येवून राज्य मंञी मंडळाने साठवण तलावासाठी शेती महामंडळाची सुमारे चार कोटी किमतीची साडे आठ एकर जमिन अंदाजे ३०लाख किमतीत देण्यास मंजुरी दिली. सदर साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावक-यांना १०० दिवस पुरेल एवढ्या क्षमतेच्या सिमेंट काँक्रेटच्या साठवण तलावाची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला धन्यवाद दिले.सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी नाम.देवेन्द्र फडणवीस,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा मंञी नामदार गुलाबराव पाटील,खासदार सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदिंसह महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे उपअभियंता भिमगिरी कांबळे,शाखा अभियंता सुनील हरदास तसेच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.यावेळी जालिंदर कुऱ्हे,रणजीत श्रीगोड, मारुतीराव राशिनकर, देविदास देसाई, भाऊसाहेब कुताळ,ग्रा.प.सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, सचिन अमोलिक, अरविंद साळवी,भरत साळुंके, रविंद्र खटोड, प्रफुल्ल डावरे, लहानू नागले,बाळासाहेब दाणी,रावसाहेब अमोलिक,पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब तेलोरे,प्रल्हाद अमोलिक,भैय्या शेख,शफिक आतार, जनार्दन ओहोळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, किशोर महापुरे, गणेश मगर,मास्टर हुडे, प्रशांत मुंडलिक,गोपी दाणी,प्रशांत लढ्ढा, सद्दाम शेख, जिना शेख, दादासाहेब कुताळ,सागर ढवळे, बाबुराव पवार,शरद अंबादास नवले, दिलीप अमोलिक, किरण गागरे, विजय अमोलिक,लक्ष्मण रशिनकर,अन्सार पटेल,राजेंद्र फुंदे,बबन मेहेत्रे,प्रविण बाठीया, बाळासाहेब शेलार पत्रकार सुहास शेलार आदी उपस्थित होते.