कृषीवार्ता

जलपुनर्भरण चळवळ गतिमान करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे सरसावल्या

जलपुनर्भरण चळवळ गतिमान करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे सरसावल्या

 

जलपुनर्भरण ही लोकचळवळ झाली; पाहीजे- जिल्हाधिकारी

 

परळीतील डॉक्टर व व्यापाऱ्यांशी साधला संवाद

 

जलपुनर्भरण ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. परळी शहर व तालुक्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जल पुनर्भरण करावे. जेणेकरून पाण्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही. तसेच जल पुनर्भरण मोहिमेसाठी परळीतील डॉक्टरांनी जनजागृती करावी. असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी परळी येथे डॉक्टर व हॉटेल व्यवसायिक यांच्याशी संवाद साधताना नगर परिषदेच्या सभागृहात केले. या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, अभियंता वामन जाधव, पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल साळवे आदिची व्यासपीठावर उपस्थिती होती. या प्रसंगी जल पुनर्भरणाचे महत्त्व विशद करताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे म्हणाल्या की, परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाई जाणू नये तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी.वेस्ट जाणारे पाणी जमिनीत मुरावे. पाणी जमीनीत मुरुन पाणीपातळीत वाढ झाली पाहिजे. यासाठी शहरातील डॉक्टर व व्यावसायिकांनी आपल्या कुपनलिका घरांचे घराचे छत, घरातील आड, विहीरींचे जल पुनर्रभरण करुन घ्यावे तसेच इतरांनाही या मोहिमेसाठी प्रवर्त करावे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक जलपुनर्भरण करतील. परळी शहरात येणार्या काळात पाऊस कमी झाला तरी जमीनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण अत्यंत महत्वाचं आहे. जलपुनर्भरण होत नसल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे म्हणजे एका प्रकारे दुष्काळात निमंत्रणच म्हणावे लागेल. ही परिस्थिती परळी शहरात निर्माण होऊ नये म्हणून रेनवॉटर हॉर्वेस्टिंग या माध्यमातून जनजागृती करून इमारती, घरांच्या छतावर चे पाणी एकत्र साठवून शोष खड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवायला पाहिजे. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी विशेषता डॉक्टरांनी व व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे