कृषी उत्पन्न बाजार समीतीत स्वच्छ व पारदर्शी कारभार करु -सभापती सुधीर नवले

कृषी उत्पन्न बाजार समीतीत स्वच्छ व पारदर्शी कारभार करु -सभापती सुधीर नवले
अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही सभापती सुधीर नवले यांनी दिली बेलापुर सेवा संस्थेच्या तसेच ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने सभापती सुधीर नवले यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सभापती सुधीर नवले म्हणाले की माझ्या रुपाने ७० वर्षानंतर बेलापुर गावाला सभापतीपद मिळाले आहे त्यामुळे गाव व परिसराला अतिशय आनंद झाला परंतु गावातील काहींना फार दुःख झाले मी सभापती होवु नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवुन ठेवले होते आमचे नेते भानुदास मुरकुटे तसेच करण ससाणे यांच्या शुभाशिर्वादामुळे मिळालेल्या पदाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच बाजार समीतीच्या भल्यासाठी करणार असुन बाजार समीतीत चुकीचे काम करणार नाही तसेच चुकीचे काम होवु देणार नाही. श्रीरामपुर बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना देखील विश्वास वाटला पाहीजे ही काळजी व्यापाऱ्यांनी घेतली पाहीजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणे हेच आपले पहीले कर्तव्य आहे. श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपबाजार असणाऱ्या बेलापुर व टाकळीभान येथेही मालाची आवक वाढविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल शेतकऱ्यांनी आपला माल श्रीरामपुर बाजार समीतीतच विक्रीसाठी आणावा असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे