अपघात

बारामतीचा बाप मीच आहे” म्हणत युवकावर गोळीबार* *आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना*

*बारामतीचा बाप मीच आहे” म्हणत युवकावर गोळीबार*

*आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना*

*बारामती शहरातील भिगवण रोडवरील पेट्रोल पंपाजवळ काल संध्याकाळच्या सुमारास एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये आकाश जाधव हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत*

 

*पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गणेश जाधव याच्यावर गोळीबार करत त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी शुभम राजपुरे व तुषार भोसले यांच्यासह अन्य आठ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकी घासून नेल्याच्या वादातून हा प्रकार घडला. शुभम राजपुरे याने ‘तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत पैदा व्हायचा आहे’ असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनदा फायरिंग केले*

 

*दुसऱ्यावेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली*

 

*दरम्यान,आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून या घटनेतील मुख्य आरोपी शुभम राजपुरे, तुषार भोसले हे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दरम्यान अन्य अनोळखींमधील काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरु असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल असे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे व सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले*.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे