तंटामुक्ती अध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार सुप्रिया धुमाळ यांना जीवे मारायची धमकी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल,

तंटामुक्ती अध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार सुप्रिया धुमाळ यांना जीवे मारायची धमकी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल,
टाकळीभान येथील तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदा साठी इच्छुक उमेदवारअसलेल्या भाजप महिला मोर्चाच्या नगर उत्तर जिल्हसरचिटणीस सुप्रिया धुमाळ यांनी
उमेदवारी अर्ज भरू नये, त्यासाठी जिवेमारण्याची धमकी तालुका पोलीस स्टेशन अर्ज दाखल,
त्याबद्दल श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक यांकडे भाजप महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस सौ. सुप्रिया प्रकाश धुमाळ यांनी या विरुद्ध अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये सौ धुमाळ यांनी नमूद केले आहे की मी गावच्या राजकारणात सक्रिय असून सध्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने याची माहिती अर्जामध्ये नमूद केलेल्या गावगुंडांना माहीत असल्यामुळे त्याचे साथीदार राहणार टाकळीभान ता. श्रीरामपूर यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना दोन दिवसापूर्वी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान गावातील वेक्ती यांनी दम दिला ,तुम्ही आमच्या विरुद्ध अर्ज भरायचा नाही, उभे राहायचे नाही, जर कोणी उभे केले, तर आम्ही एक एकाला मारून टाकू, हातपाय काढून ठेवू, बऱ्या भल्याने गावात राहायचे असेल तर नीट रहा, नाहीतर एकेकाचा बेत पाहतो असे म्हणून, गेली पाच वर्षापासून गावात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याने लोकशाही धोक्यात आल्याचे दिसते.
तरी वरील लोकांच्या गुंडगिरीला वेळीच प्रतिबंध करून मला व माझ्या कुटुंबाला तसेच गावातील सर्व नागरिकांना कायमस्वरूपी संरक्षण मिळावे ही विनंती या आशयाचा अर्ज श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक यांकडे तक्रार अर्ज दिला आहे.