महाराष्ट्राची महावक्ता खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बेलापूर महाविद्यालयाची प्रणाली पाटील प्रथम क्रमांक

महाराष्ट्राची महावक्ता खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बेलापूर महाविद्यालयाची प्रणाली पाटील प्रथम क्रमांक
बेलापूर- येथील कला वाणिज्य महाविद्यालयाची प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु.प्रणिली पांडुरंग पाटील हिने रोहित (दादा ) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचा महावक्ता खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमधे प्रथम क्रमांक पटकावला आहे .हे पारितोषिक मा.नामदेव देवा राऊत यांनी २१००० /- रु. , फिरता करंडक ,प्रमाणपत्र प्रदान केले.या स्पर्धा सावता ग्रूप जवळा,मा.सावता हजारे,मा.प्रदिप हजारे युवानेते जवळा,मा.प्रशांतभाऊ शिंदे,मा.संजय (काका) काशिद,मा.अमोल हजारे,मा.तुषार(भाऊ)काढणे, मा.काकासाहेब वाळुंजकर उपसरपंच जवळा,राहुल हजारे,जीवन रोडे, तुषार (दादा) कोल्हे,अशोक हजारे, औदुंबर कोल्हे आदि सर्व युवा कार्यकर्त्यांनी आयोजित केल्या होत्या.खुल्या गटातील एकूण ४५ स्पर्धकांतून बेलापूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाली पाटील हिस मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम पारितोषिक मिळाले.तिच्या या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके ,खजिनदार हरिनारायण खटोड ,सचिव अॅड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, बापुसाहेब पुजारी,नंदूशेठ खटोड,श्रीवल्लभ राठी, शेखर डावरे नारायणदास सिकची, हरिश्चंद्र पाटील महाडिक, सुरेश मुथ्था,प्रेमा मुथ्था,लीलावती डावरे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, भरत साळुंके, रविंद्र खटोड,अॅड.विजय साळुंके, राजेंद्र सिकची,सौ.सुविद्या सोमाणी,प्रा.हंबीरराव नाईक,शिक्षक प्रतिनिधी उपप्राचार्य सुनिता ग्रोव्हर , बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, वक्तृत्व समितीचे चेअरमन डॉ.बाळासाहेब बाचकर,निजाम शेख, डॉ.अशोक माने तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थीनी, पालक ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.