28 लाखांची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक..! नाशिक ACB ची मोठी कारवाही.
28 लाखांची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक..! नाशिक ACB ची मोठी कारवाही.
टाकळी भान प्रतिनीधी – नाशिकमध्ये लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने (ACB) खूप मोठी कारवाई केली आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी आज तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना आदिवासी विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना अटक केली आहे.बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी लाच मागितली होती. अखेर या प्रकरणी एसीबीने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या अधिकाऱ्याची नाशिकमध्ये शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचा संशय एसीबी अधिकाऱ्यांना आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचे अभियंता दिनेकुमार बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. दीड कोटी रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. या अधिकाऱ्याने एका ठेकेदाराकडे लाच मागितली होती. अखेर या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्याकडून 28 लाखांची लाचेची रोख रक्कम जप्त केली
संबंधित अधिकाऱ्याकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय एसीबी अधिकाऱ्यांना आहे. तब्बल 15 दिवस एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. एसीबीने गेल्या दोन दिवसात अनेक कारवाई केल्या आहेत. त्यापैकी ही मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या फाईली पडून असतात. नाशिकचं आदिवासी विकास भवन हे फक्त नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण राज्याचं आहे. इथूनच सर्व राज्यातील आदिवासी विभागाचं कामकाज चालतं. पण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडूनच अशाप्रकारचं काम केलं जात असेल तर हे प्रकरण अतिशय दुर्देवी आहे