भोकरला रेणुका माता मंदीरामध्ये नवराञ उत्सवानिमीत्त गाथा पारायण व किर्तण महोत्सवाचे आयोजन..

भोकरला रेणुका माता मंदीरामध्ये नवराञ उत्सवानिमीत्त गाथा पारायण व किर्तण महोत्सवाचे आयोजन..
टाकळीभान प्रतिनीधी – सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जागृत देवस्थान रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव, गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भोकर येथील जागृत देवस्थान रेणुका माता मंदिर येथे नवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्ताने गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड, महंत राम रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेट, वैष्णव सेवा आश्रमाचे ह.भ.प साहेबराव महाराज कांगणे, व ह.भ.प. भागवताचार्य कु.आरतीताई शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली गाथा पारायण सोहळा (वर्ष ७ वे) पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ वाजता आरती, सकाळी ७ ते १२ गाथा पारायण, दुपारी १२ ते २ दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी ३ ते ५ किर्तन, सायं ६ वाजता हरीपाठ, व ७ वाजता आरती या दैनंदीन दिनचर्येसोबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांच्या हजेरीमध्ये कीर्तन महोत्सव सोहळा बुधवार दि.२८ सप्टेंबर २२ ते बुधवार ते दि. ४ ऑक्टोबर २२ पर्यंत आयोजन करण्यात आले असून यामध्ये बुधवारी ह.भ.प.संतोष महाराज पटारे भोकर, गुरुवार ह.भ.प.भूषण महाराज तळणीकर लातूरकर, शुक्रवार ह.भ.प. अशोक महाराज ईलग बोधेगाव, शनिवार ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले पाथरी परभणी, रविवार ह.भ. प. सौ गितांजलीताई झेंडे पुरंदर पुणे, सोमवार ह.भ.प.मनिषाताई बिडाईत औरंगाबाद, मंगळवार ह.भ.प.किर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे बीड गेवराई, यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून दररोज किर्तन सेवेनंतर सायं ५ वाजता खिचडी प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.व बुधवार दि, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दिंडी प्रदक्षिणा होईल व त्यानंतर भागवताचार्य ह.भ. प. आरतीताई शिंदे भोकर यांचे काल्याचे किर्तन होईल. व खंडेराव पटारे, रतन काळे, लहाणू ढाले, लक्ष्मण पटारे, सिताराम पटारे, वसंत ढाले,यांचे कडून महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे, या सप्ताहामध्ये ह.भ.प. अरुणनाथगीरी महाराज अडबंगनाथ देवस्थान, ह.भ.प.निवृत्ती महाराज विधाटे, ह.भ.प. सुदाम महाराज चौधरी, ह.भ.प. राधेश्याम महाराज पाडांगळे, ह.भ.प.संगीताताई शेजुळ, ह.भ.प. मधु महाराज चौधरी, यांचे मार्गदर्शन लाभनार आहे.तरी या ज्ञानामृत किर्तन महोत्सव व गाथा पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा युवा प्रतिष्ठानचे गणेश छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाधर गायकवाड, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, व नवराञ उत्सव कमेटीकडून करण्यात आले आहे.