गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं जातंय’
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं जातंय’
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असल्याचा संशय आमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आमदारांना आपण काय बोलतोय किंवा करतोय, याची जाणीवर नसल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला.
‘मातोश्री’त सत्ताकेंद्र, शरद पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, आज घेणार मोठा निर्णय?
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी यांनी हा दावा केला. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गोटातून परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीदेखील आपल्याला जबरदस्तीने इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांच्या या नव्या दाव्यामुळे रॅडिसन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना बंडखोरांच्या सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता रोख पैसे नसले तरीही ‘असं’ मिळणार तिकीट
काही तासांपूर्वीच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची आपला गटनेता म्हणून निवड केली होती. या प्रसंगाची एक व्हिडिओ क्लीपही प्रसिद्ध झाली होती. याच क्लीपचा दाखला देत अमोल मिटकरी यांनी म्हटले की, या व्हिडिओत शिंदे साहेबांचा विजय असो, असे बोलताना समोर बसलेल्या काही आमदारांचे हात खाली असल्याचे दिसत आहेत. मी हा व्हिडिओ माझ्या ओळखीतील एका मानसोपचार तज्ज्ञांना दाखवला आणि त्यांचे मत विचारले. तेव्हा त्यांनी या आमदारांना गुंगीचे औषध दिले जात असावे, अशी शक्यता बोलून दाखवली.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तृणमूल काँग्रेसची एन्ट्री, ममता दीदींची थेट आमदारांना ऑफर!
कदाचित या आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असावे. त्यामुळे जेवणानंतर या आमदारांच्या स्मरणात काहीही राहत नसावे. आपण काय करतोय किंवा बोलतोय याचे भान या आमदारांना नसेल, असे मिटकरी यांनी म्हटले. ही गोष्ट संबंधित आमदारांच्या कुटुंबीयांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावी,असे आवाहनही अमोल मिटकरी यांनी केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून या आरोपाला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.