आरोपीला कठोर शिक्षा व्हावी…

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी…
श्रीगोंदा दलित महासंघाची मागणी
धानोरी उस्मानाबाद येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षीय मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी श्रीगोंदा दलित महासंघाच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले.
उस्मानाबाद जिल्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी गावामध्ये पाच वर्षीय मुलगी अंगणवाडीत शिक्षण घेत होती .दि.18 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपीने अंगणवाडीत जाऊन सदर अल्पवयीन मुलीला चॉकलेट देतो म्हणून घेऊन गेला. मुलीला चॉकलेट देऊन त्याने एका निर्जन स्थळी बंद असलेल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर त्याने या मुलीला घरी आणून सोडले .घरी आल्यावर मुलीने सगळा प्रकार आईला सांगितला. हा सगळा प्रकार ऐकल्यावर पीडित मुलीची आई, वडील ,आजोबा यांनी लोहारा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती .सदर घटनेचे गांभीर्य पाहून लोहारा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. घटनेचा तपास डीवायएसपी रमेश बरकटे हे करत आहे.
या घटनेने राज्यात खळबळ उडल्यानंतर विविध दलित संघटना त्यामध्ये बहुजन रयत परिषद, लहुजी शक्ती सेना, आधुनिक लहुजी शक्ती संघटना, श्रीगोंदा तालुका सकल मातंग कोर संघटन या संघटनांनी निषेध केलेला आहे.श्रीगोंदा येथील दलित महासंघाच्या वतीने नायब तहसीलदार ढोले मॅडम यांना निवेदन दिले आहे.सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकर कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत सकट,खादी ग्रामोद्योग माजी चेअरमन भगवान गोरखे, श्रीगोंदा तालुका सकल मातंग कोर कमिटीचे अध्यक्ष नंदुभाऊ ससाणे, बहुजन रयत परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बापू गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष संदीप उमाप, श्रीगोंदा तालुका सकल मातंग समाज कोर कमिटीचे सचिव मनोज घाडगे, संतोष गोरखे, लहुजी शक्ती सेनेचे शहाराध्यक्ष प्रफुल्ल अढागळे,दादासाहेब ठवाळ, रमेश रजपूत,संदीप ससाणे आदी उपस्थित होते.