दूध दर घटल्याने ग्रामीण भागाची आर्थिक उलाढाल ठप्प खर्चच भागत नसल्याने दुग्ध व्यवसायिक चिंतेत.

दूध दर घटल्याने ग्रामीण भागाची आर्थिक उलाढाल ठप्प खर्चच भागत नसल्याने दुग्ध व्यवसायिक चिंतेत.
ग्रामीण भागात पहिले शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करत असत परंतु आता दूध धंदा प्रामुख्याने शेतकरी करताना दिसत आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने सर्व शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेले आहे तसेच ग्रामीण भागात नोकरी करण्याकडे युवकांचा कौल असला तरी सर्वच स्तरावर पूर्तता पडत नसल्याने ग्रामीण भागातील कितीतरी नवयुवक दूध व्यवसाय उतरलेले आहे. हक्काचे पैसे मिळतात म्हणून शेतकरी वर्गात दुध धंदा करताना दिसत असल्या तरी दूध धंदा देखील शेतकऱ्यांना आता रडवत असल्याचे दिसत आहे.
दूध धंदा सध्या परवडत नसल्याने बोलले जात आहे हे देखील तितकेच सत्य असले तरी शेतकरी मात्र नफा ना तोटा या बजेटवर काम करताना दिसत आहे सध्याचे दूध दर 28 रुपये झाले आहेत गेली चार महिन्यापूर्वी 38 रुपये दर होते. तर या मधील दहा रुपयाचा फरक ही मलाई नेमकी कोण खातं असा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे.
तेव्हा चारा देखील जास्त प्रमाणावर उपलब्ध होता पाऊस कमी पडल्याने पाण्याची टंचाई भासू लागलेली आहे चारा कमी पडत असल्याने दूध देखील कमी प्रमाणात शेतकरी पूर्वत असताना एवढी आवक कुठून होत आहे. याकडे देखील प्रशासकीय यंत्रणे लक्ष देण्याची गरज आहे सध्या जास्त प्रमाणावर भेसळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तेव्हा शासनाने हे पांढरे बोके यांना वेळीच लगाम घातला तर शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे व मेहनतीचे पैसे मिळतील असेही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे.
सध्याचा पशुखाद्य औषधे व चारा यांचा खर्च निघत नाही त्यामुळे दूध व्यवसायात उतरलेले नवतरुण खर्चही निघत नसल्याने चिंतेत दिसत आहे.
सध्या सारा औषधे व पशुखाद्य तसेच संगोपन खर्च निघत नसल्याने मांजरी तिळापुर वांजुळपोई व कोपरे या भागातील शेतकरी व नव दूध व्यवसायिक तरुण यांनी दुग्धविकास मंत्र्यांनी याकडे लक्ष घालून दुधाला किमान 45 रुपये दर देण्याची मागणी केलेली आहे तसेच घाम गाळून जो शेतकरी दूध घालतो सध्याच्या परिस्थितीत पाऊस कमी पडल्याने पाणी कमी झाले चारा कमी पडत आहे दूध उत्पन्न कमी होत आहे. दुधाची आवक कुठून वाढत आहे यातील पांढऱ्या बोक्यावर त्वरित कारवाया कराव्या ही देखील मागणी या भागातील दूध व्यवसाय करताना दिसत आहे.
याकडे शासन व दुग्धविकास मंत्री कधी लक्ष देणार याकडे बघायची वेळ आलेली आहे असे शेतकऱ्यांचे मत आहे नाहीतर लवकरच दूध व्यवसायिक नवतरुण लवकरच दुग्ध विकास मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन लवकरच पुढील दिशा ठरवणार असल्याचेही बोलले जात आहे.