कृषीवार्ता

शेतकर्‍यांनी हक्काच्या पाण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे माजी आमदार अमरसिंह पंडित   

शेतकर्‍यांनी हक्काच्या पाण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे माजी आमदार अमरसिंह पंडित   

माजी आमदार मा. श्री. अमरसिंह पंडित यांना संधी मिळेल तेथे त्यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आवाज उठविला. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत समन्यायी पाणी वाटपासाठी सातत्यपूर्ण मांडणी केली. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी सुप्रिम कोर्टापर्यंत आजवर न्यायालयीन लढाई लढली आहे. सोमवार, दि.२० नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ११ वाजता मराठवाड्याच्या हक्कासाठी जन आंदोलन करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

  मराठवाड्यातील बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह मध्य गोदावरी खोऱ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी पडल्यामुळे मराठवाड्याच्या धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. टंचाईच्या झळा अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणात ४० टक्केहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिकि पाणी वापर लक्षात घेता भविष्यकालीन वापरासाठी हा पाणीसाठा अपुरा ठरणार आहे. जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात ठरवून दिलेल्या पाणी वापरापेक्षा गोदावरी नदीवर पाणी वापराची असंख्य धरणे भरल्यामुळे जायकवाडी प्रकल्पात निर्धारीत पाणीसाठा उपलब्ध होवू शकला नाही.

 

  शासनाने २००५ मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा अस्तित्वात आणला, या कायद्यातील कलम १२ (६) (क) अन्वये दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांच्या पाणी साठ्याचा आढावा घेवून समन्यायी तत्वावर सर्व धरणातील पाण्याची टक्केवारी सारखी राहील या पध्दतीने पाण्याचे नियमन करणे आवश्यक आहे, ही बाब शासनाला वारंवार लेखी स्वरुपात अवगत करून श्री.अमरसिंह पंडित यांनी तसा आढावा घेवून पाणी सोडण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावापोटी शासन आणि प्रशासन पाणी सोडण्याची कार्यवाही केली नाही. जाणीवपूर्वक त्यांना न्यायालयात जाण्यासाठी संधी देण्याचे काम शासन करत आहे.

 

  पाणी सोडण्यास विलंब झाल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो, हा इतिहासा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा तिव्र होण्यापूर्वी उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडावे या मागणीसाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अमरसिंह पंडित यांच्यासह मराठवाड्यातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्यावतीने सोमवार, दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे भव्य जन आंदोलन करण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे