मुठेवाडगावकरांनी रक्तदान करून जपला सामाजिक उपक्रम

मुठेवाडगावकरांनी रक्तदान करून जपला सामाजिक उपक्रम
टाकळीभान प्रतिनिधी:- हरीनाम सप्ताह म्हटला की,अध्यात्म,भक्ती व भगवंत यावरील प्रबोधन तसेच ज्ञानदान व अन्नदानाचा सोहळा.परंतु अध्यात्माला सामाजिक उपक्रमाची जोड देत मुठेवाडगाव ग्रामस्थांनी ईश्वरसेवेसोबत रक्तदानाद्वारे समाजसेवा करत वारकरी संप्रदायाची तत्वे व आदर्श जपत प्रेरणादायी उपक्रम राबवुन आदर्श निर्माण केला.
श्रीरामपुर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे संत तुळशीराम महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील 30 जणांनी रक्तदान केले.तर आरोग्य तपासणी शिबीरात ५२ नागरीकांची तपासणी करण्यात आली.तसेच ५० नागरीकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले.
किसन महाराज पवार व विजय महाराज कुहीले यांच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या या सप्ताहाची आज बुधवार रोजी उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.
सप्ताह काळात मुठेवाडगावातील भाविकांनी श्री क्षेत्र द्वारका येथील गोमती माता नदीचे पवित्र जल पायी दिंडीसह आणत या पवित्र जलाने संत तुळशीराम महाराज मुर्तीचा अभिषेक करण्यात आला.
आधार ब्लड बँक तसेच साईसेवा रक्तदान परीवार व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर तर प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेवतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ, उन्मेश लोंढे,डॉ.पांडुरंग जाधव,डॉ.प्रीती वाडेकर,सत्यम पवार,आरोग्य सेवक मयूर पटारे,सोनाली राऊत,निकिता तेलतुंबडे,आशा स्वयंसेविका वंदना रोकडे आदिंनी शिबीर यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.तसेच यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय मुठे,सरपंच सागर मुठे,डॉ.शंकर मुठे,बबन मुठे,वसंत मुठे,देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब मुठे, केशव आसने, अभयकुमार तेलतुंबडे,मनोज मुठे,रामेश्वर मुठे आदिंसह ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभयकुमार तेलतुंबडे यांचे १२१ वेळा रक्तदान,
या रक्तदान शिबीरात मुठेवाडगाव येथील ग्रामस्थ अभयकुमार तेलतुंबडे यांनी १२१ व्यांदा रक्तदान करत तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.या कामाबद्दल त्यांना विविध सामाजिक व शासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या एका रक्तदानाने एक जीव आपण वाचवु शकतो.रक्तदान हे ईश्वराचेच केलेले काम असुन यातुन मिळणारे समाधान हे ईतर आनंदापेक्षा मोठे असल्याचे तेलतुंबडे यांनी सांगितले.