विरभद्र बिरोबा महाराज वांगी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात

विरभद्र बिरोबा महाराज वांगी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक वांगी खुर्द व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत वीरभद्र बिरोबा महाराज येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष26 वे उत्साहात सुरुवात झाली. शांतिब्रह्म हरिभक्त परायण महंत परमपूज्य गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त परायण स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दिनांक 4/2/25 रोजी सुरुवात होऊन यामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे च4 वाजता काकडा 6 ते 7 विष्णुसहस्रनाम 7 ते 11 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 5 ते 6 हरिपाठ व रात्री 7ते 9 हरिकीर्तन त्यानंतर9 ते 10महाप्रसादाचे वाटप होत असते. यामध्ये कीर्तन सेवा मंगळवार 4/2/25 ह भ प योगेश महाराज होन, 5/2/25 ह भ प मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्री, 6/2/25 ह भ प अर्जुन महाराज शास्त्री, 7/2/25 ह भ प लक्ष्मण महाराज नांगरे, 8/2/25 ह भ प विश्वनाथ गिरीजी महाराज, 9/2/25 ह भ प गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, 10/2/25 ह भ प वेदांत चार्य देविदासजी महाराज म्हस्के (संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा) तसेच मंगळवार दिनांक 11 /2 /25 रोजी हरिभक्त स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज (देवगड संस्थान) यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.
या सप्ताहाच्या सुरुवातीला धर्म ध्वज उभारणीसाठी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश भाऊ बेग यांच्या हस्ते पूजन करून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मच्छिंद्र महाराज चोरमले सागर भाऊ शेटे लखन मखिजा राहुल गाडेकर राहुल धागुडे तसेच ज्ञानेश्वरी पारायण वाचक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.