*अ. भा. फा. असोसिएशन शिर्डी प्रचार सुभारंभ संकल्प पॅनल विजयी होणारच* *संकल्प पॅनल प्रमुख सचिन भाऊसाहेब गुलदगड*

*अ. भा. फा. असोसिएशन शिर्डी प्रचार सुभारंभ संकल्प पॅनल विजयी होणारच* *संकल्प पॅनल प्रमुख सचिन भाऊसाहेब गुलदगड*
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य अधिकृत संकल्प पॅनलच्या माध्यमातून शिर्डी च्या पावन भूमीत प्रचार शुभारंभ
आज रोजी शिर्डीत साईबाबा चे दर्शन घेऊन संकल्प पॅनलच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्यामार्फत साईबाबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सन्मानित सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस उपस्थित पॅनल प्रमुख फार्मासिस्ट रोहित वाघ प्रदेश सचिव व पॅनल प्रमुख फार्मासिस्ट सचिन भाऊसाहेब गुलदगड प्रदेश उपाध्यक्ष व संकल्प पॅनल चे उपस्थित उमेदवार दत्ता मारोती खराटे, ज्ञानेश्वर विठ्ठल पायघन , महादेव बाळासाहेब मुंडे , नासिर इस्माईल पठाण, बालाजी मल्हारी नरवटे, व संजय चकोर , या सर्वांचा त्यावेळेस सत्कार करण्यात आला. अयोजक् प्रदेश प्रवक्ते राहुल बाळासाहेब पारखे व गणेश सोनवणे राज्य कार्यकारणी सदस्य यांच्यामार्फत सत्कार संभारम करण्यात आल . या आढावा बैठक मध्ये उमेदवार व पॅनल प्रमुख यांनी आपली मते मांडली त्यामध्ये उमेदवार महादेव बाळासाहेब मुंडे यांनी बोलताना सांगितले की अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटना फार्मासिस्ट हितासाठी काम करत आहे , आणि या संकल्पनेला तरुणाचा पॅनल आहे हा नक्कीच एम एस पी सी मध्ये क्रांती घडवेल असे त्यांनी बोलताना सांगितले , त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी बोलताना असे सांगितले की ही संघटना फार्मसीच्या विविध क्षेत्रांमध्ये फार्मसिस्ट आहेत त्यांचे विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे , त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष पॅनल प्रमुख सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी सांगितले की संकल्प पॅनल हा महाराष्ट्र मध्ये तालुके जिल्हे गाव लेवल पर्यंत पोहोचलेला आहे मला असा विश्वास आहे की संकल्प पॅनल ला बहुमताने विजयी करतील , त्यानंतर राज्य कार्यकारणी सदस्य नाशिक विभागीय अध्यक्ष प्राध्यापक सुशील महाराज यांनी बोलताना सांगितले की या संघटनेमार्फत विविध फार्मासिस्ट प्रश्न सोडवत आले आहेत त्यामध्ये औषध निरीक्षकाची अट रद्द करा, आंतर फार्मासिस्ट covid उद्या घोषित करा , त्यानंतर आरोग्य प्रतीचा गोंधळ, बोगस डॉक्टर यासारखे मुद्दे सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील, त्यानंतर प्रदेश कार्याध्यक्ष नासरी स्माईल पठाण त्यांनी असे सांगितले की ही संघटना महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचली आहे या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल, राज्य कार्यकारणी सदस्य व विदर्भ विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पायघन बोलताना असे म्हणाले की महाराष्ट्र मध्ये सर्वात बेरोजगार फार्मासिस्ट आहेत आणि बेरोजगार फार्मासिस्ट चे प्रश्न आम्ही सोडवले आहेत यापुढे सोडवत राहणार असे त्यांनी बोलताना सांगितले . सागर शिंदे मराठवाडा विभागीय सचिव यांनी बोलताना सांगितले की ही संघटना फार्मसीचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे भर देत आहे ही संघटना या निवडणुकीत ते नक्कीच बाजी मारेल असे मत त्यांनी व्यक्त केले . आढावा मीटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला व सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुरस्कृत संकल पॅनल बहुमताने विजय होईल असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शेवटी राज्य कार्यकारिणी सदस्य बालाजी नरवटे सर यांनी बोलताना असे सांगितले की आम्ही आत्तापर्यंत बरेच फार्मसिस्ट बांधव पर्यंत पोहोचलो आहे व त्यांच्या मार्फत आम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स मिळाला आहे असे बोलतांना आभार व्यक्त केले .