महाराष्ट्र
बातमी. टाकळीभान येथे महिला दिन साजरा.

जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जात असून आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. महिलांच्या हक्काचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने महिला दिन साजरा केला जातो. आजचा दिवस हा महिलांच्या स्त्री-शक्तीला प्रणाम करण्याचा आहे. टाकळीभान येथे प्रथमच महिला दिन साजरा करून महिलांचा सन्मान करण्यात आला असून या पुढेही दर
वर्षी महिला दिन साजरा करण्यात यावा असे आवाहन
माजी नगरसेविका सौ. मजूश्रीताई मुरकुटे यांनी केले.
टाकळीभान ग्रामपंचातच्या स्व. गोविंदराव
आदिक सभागृहात मयुर पटारे युवा मंच, ग्रामपंचायत, लोकसेवा महिविकास आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिना निमित्त महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मुरकुटे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या.
यावेळी अशोक कारखान्याच्या संचालिका हिराबाई साळुंके, ग्रामपंचायत सदस्या अर्चना पवार,
लताबाई पटारे, कालिंदा गायकवाड, भाजपाच्या महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ. शुभांगी खेडकर उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना मंजुश्रीताई मुरकुटे पुढे म्हणाल्या
की, टाकळीभान येथे प्रथमच महिला दिन साजरा केला जात असून यापुढेही महिला दिन साजरा करावा
महिला दिनानिमित्त महिला एकत्र येवून त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होत असते. महिलांनी मुलांवर चांगले संस्कार करून मुलांना घडवावे त्यामुळे मुलांना चांगले संस्कार मिळून चांगली पिढी
निर्माण होईल असे सांगून त्यांनी सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकसेवा महाविकास इघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अशोक कारखान्याचे माजी संचालक भाऊ थोरात, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य बापूसाहेब पटारे, सरपंच अर्चना रणनवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते २३ अंगणवाडी सेविका, मदतनिस, १० आशा सेविका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी विमल माळी, ललीता गव्हाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ. शुभांगी खेडकर, कर्मचारी अमीना सय्यद, मनिषा भोसले, पत्रकार अनिता तडके, प्रो
कबड्डी पुणेरी पलटन संघात ऊत्कृष्ठ कामगिरी करणार्या अस्लम इनामदार यांची माता जाकिरा इनामदार, पायी नर्मदा परिक्रमा करणार्या ह. भ. प.
संगिताताई शेजूळ, छाया चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवर मजुश्रीताई मुरकुटे, हिराबाई साळुंके, अर्चना रणनवरे, अर्चना पवार, लताबाई पटारे
कालिंदा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी संचालक दत्तात्रय नाईक, ग्राम
पंचायत सदस्य मयुर पटारे, यशवंत रणनवरे, सुनिल बोडखे, सुंदर रणनवरे, माजी उपसरपंच पाराजी पटारे
शिवाजी पटारे, शिवाजी पवार, अशोकचे माजी संचालक एकनाथ लेलकर, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, भाऊसाहेब कोकणे, शरद रणनवरे
संजय रणनवरे, अशोक बनकर, अशोक तुपे, मिलींद
शेळके, सुनिल रणनवरे, राहूल म्हस्के आदी उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाराजी पटारे यांनी केले तर आभार मयुर पटारे यांनी मानले.
टाकळीभान— येथील ग्रामपचायत मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका मंजुश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.