मेजर अनिल घोरपडे यांचा देश सेवेबद्दल सोनईकराचा वतीने आज सत्कार.

मेजर अनिल घोरपडे यांचा देश सेवेबद्दल सोनईकराचा वतीने आज सत्कार.
मेजर अनिल घोरपडे हे २१ वर्ष देश सेवा करुन उद्या दि ३ रोजी निवृत्त होत आहेत त्याबद्दल सोनई कराच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे आंबेडकर चौक येथून घोरपडे यांची मिरवणुक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक एस टी स्टँड राहुरी रोड येथे येईल हाँटेल जनपथ येथील प्रांगणात जिल्हा परिषदेचे अर्थ पशुसंवर्धनचे माजी सभापती सुनिल भाऊ गडाख यांच्या हस्ते अनिल घोरपडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे. अनिल घोरपडे यांचे सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये झाले असुन घोरपडे २००२ मध्यें मिलिटरी मध्ये भरती झाले त्याची पहिली पोस्टींग कारगिल येथे झाली व नंतर त्यांनी जोथपुर राजस्थान पुंछ जमुकाशमीर दिल्ली देहरादून उत्तराखंड पठाणकोट गुजरात मेघालय आदी ठिकाणी २१ वर्ष देश सेवेची सेवा बजावलीय देशांची सेवा करुन आपल्या भूमित दाखल होत असल्याने सोनई येथील त्यांच्या युवक मित्रांनी घोरपडे यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे तरी या सत्कार सोहळ्यासाठी जास्तीत युवक मित्रांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे