कोळगाव येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे याबाबत

कोळगाव येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे याबाबत
कोळगाव येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे याबाबत सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटीच्या वतीने व मागासवर्गीय समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुलथे यांना आज दिनांक 12 जुलै 2022 रोजी निषेध निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की 5 जुलै 2022 रोजी मागासवर्गीय समाजातील मुलांना काही गाव गुंडांनी विनाकारण मारहाण करत समूहवाचक जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वत्रिक ठिकाणी त्यातील एकाचे केस कापून कपडे फाडून अर्धनग्न करत गावभर मारहाण करत धिंड काढण्याचा प्रकार एका ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून समोर आला आहे व त्या गोष्टीचा राज्यभर विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांनी निषेध केला.
सदर प्रकरणाबाबत सर्व मागासवर्गीय बांधवांमध्ये संभ्रम होता की नेमकी घटना काय आहे व ते समोरही येत नव्हते मात्र काल 11 जुलै 2022 रोजी बेलवंडी स्टेशन येथे रात्री उशिरा पोलीस स्वतः फिर्यादी होऊन व्हिडिओ क्लिप मधील तीन पुरुष सह एक महिला व दहा ते पंधरा इसमान विरुद्ध दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण होणे तसेच सार्वत्रिक गैर कायदेशीर मंडळी जमून जातिवाचक शब्दप्रयोग करणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली बाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. तरी सदर प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत नमूद घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नमूद कोळगाव दलित अत्याचारांचा घटनेचा सर्व सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटी व सर्व मागासवर्गीय बांधव यांनी जाहीर निषेध करत असून अशा गैर संविधानिक कृत्याबाबत स्थानिक प्रशासनाने नमूद आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे अन्यथा याप्रकरणी संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी सकल मातंग समाज श्रीगोंदा तालुका कोअर कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार भाऊ ससाने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, खादी ग्रामोद्योग चे माजी चेअरमन भगवानराव गोरखे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप,लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, शहराध्यक्ष प्रफुल अडागळे, कोअर कमिटीचे सचिव मनोज घाडगे, दत्तात्रय काळेवाघ,संतोष शेंडगे लहुजी शक्ती सेना प्रसिद्धीप्रमुख, बापूसाहेब ओहोळ, दादासाहेब ठवाळ, संदीप अवचिते,पत्रकार अनिल तुपे आदी समाज बांधव कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…