निवडणुकीसाठी देवळाली नगरपालिका व राहुरी नगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पॅनल

१८ ऑगस्ट२०२२ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी देवळाली नगरपालिका व राहुरी नगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पॅनल लावण्यासाठी वंचितच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज दिनांक 11 -07 2022रोजी देवळाली फॅक्टरी येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली…
18 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या निवडणुकींसाठी संपूर्ण राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सर्व नगरपालिकेला पॅनल उभा करण्याचे आदेश वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आज राहुरी फॅक्टरी येथे राहुरी नगरपालिका व देवळाली नगरपालि केला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पॅनल उभा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कसे करावे त्याचे मार्गदर्शन जिल्हा अध्यक्षांनी व जिल्हा महासचिव अनिल राव जाधव यांनी केले. यावेळी देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे व राहुरी शहर अध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनी आपल्या शहरातील कार्यकारणी तसेच संभाव्य उमेदवारांची यादी जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केली. केली तसेच देवळाली नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे किमान ९ नगरसेवक निवडून येतील आणि वंचित चे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकरांची सभा या ठिकाणी घेतली तर संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचा पॅनल देवळाली नगरपालिकेला निवडून येऊ शकतो असे मनोगत देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे यांनी केले. तसेच देवळाली नगरपालिकेला 21 जागांसाठी मतदान होणार आहे आणि हे 21 च्या 21 उमेदवार देवळाली नगरपालिकेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देवळाली नगरपालिकेसाठी असणारे किमान 13 उमेदवार हे आपल्या वार्डामध्ये किमान 15 ते 20 लाख रुपये खर्च करू शकतात इतक्या ताकतीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीला देवळाली नगरपालिकेसाठी मिळालेले आहेत असे आपल्या मनोगतामध्ये साईनाथ बर्डे यांनी यावेळी सांगितले.
तसेच राहुरी शहराध्यक्ष विजय साळवे यांनी देखील आपल्या कामाचा लेखाजोखा जिल्हा अध्यक्ष व जिल्हा महासचिवांकडे सुपूर्द केला. राहुरी नगरपालिकेला २४ जागांसाठी मतदान होणार आहे. शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनी राहुरी शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी चा पॅनल संपूर्ण होणार असल्याचे सांगितले व आज मी तिला १३ उमेदवार राहुरी नगरपालिकेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उरलेले बाकी उमेदवार हे येत्या दोन दिवसांमध्ये राहुरी तालुका अध्यक्षांकडे यादी देऊन दिले जातील असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
दोन्ही शहराध्यक्षांची मनोगते ऐकल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, राहुरी तालुका मार्गदर्शक बाबुराव मकासरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मकासरे,जिल्हा सचिव बाबा साठे,जिल्हा संघटक निलेश जगधने, जिल्हा महासचिव अनिलराव जाधव जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आलेल्या भावी नगरसेवकांना आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव यांनी देवळाली नगरपालिका आणि राहुरी नगरपालिका साठी संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचा पॅनल हा ताकतीने लावला जाईल व पक्षाकडून संपूर्ण सहकार्य भावी उमेदवारांना दिले जाईल याचे आश्वासन दिले व राहुरी तालुका अध्यक्ष तालुका कमिटी व जिल्हा कमिटी कडून संपूर्ण वेळ नगरपालिकेच्या प्रचारासाठी दिला जाईल तसेच निवडणुकीचे प्रचार साहित्य हे पक्षाकडून पुरवले जाईल तसेच निवडणुकीमध्ये विरोधी पार्टी कडून जर उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव, दादागिरी केली तर तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे उमेदवारासोबत खंबीरपणे उभे राहतील व अशा दादागिरीला किंवा दबाव टाकणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल त्याच्यामुळे उमेदवारांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. तसेच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गोरगरीब वंचित घटकांचा हक्काचा पक्ष आहे. हा मेसेज संपूर्ण शहरामध्ये वार्डामध्ये आणि सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींमध्ये रुजवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे असे कार्यकर्त्यांना यावेळी सांगण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा महासचिव अनिल राव जाधव, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, तालुका महासचिव संदीप कोकाटे जिल्हा संघटक निलेश जगधने, जिल्हा सचिव बाबा साठे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मकासरे राहुरी तालुका मार्गदर्शक बाबुराव मकासरे, युवा तालुका अध्यक्ष आकाश दिवे,युवा तालुका उपाध्यक्ष राहुल मकासरे, राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, देवळाली शहराध्यक्ष शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, राहुरी फॅक्टरी अध्यक्ष नवनाथ गजर शहर उपाध्यक्ष संदीप कदम, राहुरी फॅक्टरी उपाध्यक्ष बाबा,नानासाहेब उंडे तसेच वंचित बहुजन आघाडी ची उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार या बैठकीसाठी उपस्थित होते.
येणारी निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत, संघटनेसोबत स्थानिक जिल्हा कमिटी निर्णय घेऊन युती करू शकते. असा पक्षाचा आदेश असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काही संघटना वंचित सोबत युती करू इच्छितात त्यांची बैठक येत्या आठ दिवसांमध्ये राहुरी फॅक्टरी येथे लावण्यात येणार आहे अशी माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव यांनी दिली आहे.
अनिलराव जाधव
(जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी)