निराधार साक्षी जाधवला मिळाली शिक्षणा- साठी आधार फाउंडेशनची मदत*
*राहुरीच्या निराधार साक्षी जाधवला मिळाली शिक्षणा- साठी आधार फाउंडेशनची मदत*
पाचवीला असताना अपंग वडील वारले.आईही अपंग… स्वतःचे घर नाही. नातेवाईक यांच्या मदतीने मांडवगण,नगर येथे 7वी ते 10वी वसतीगृहात राहून शिक्षण घेतले.
अत्यंत विपरीत परिस्थिती असताना साक्षी जाधव हीने दहावीला 84% गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवत समाजात आदर्श निर्माण केला. अशी माहिती राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देव्हारे यांनी दिली.
वडील एका आश्रम शाळेत काम करायचे,वडील 2017 मधी अपघातात वारले.घरावर मोठं संकट पसरले. आईही अपंग एक लहान भाऊ चौथीत राहुरी येते शिक्षण घेत आहे. आई थोडफार काम करुन जे कमवते.. त्यावरच कुटुंबाचे पालन-पोषण चालू आहे. पण दोन वेळचे जेवण मिळणेही मुस्कील. अशी परिस्थिती आहे.
सामाजिक कार्यकर्ते व आधार शिलेदार रामदास सोनवणे यांनी ही सत्य परिस्थिती पाहिली. तिला लोणी येथील मुलीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला.
आधार फाऊंडेशन संस्थेने नुकतीच साक्षीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. तिला नुकतेच वह्या, पुस्तके, शूज,सॅक, गणवेशासाठी एक हजाराची मदत मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ खामकर यांचे हस्ते दिली.
यावेळी विठ्ठल व्यवहारे, आधार सदस्य तसेच माजी गटविकास अधिकारी हरिभाऊ खामकर, सुखदेव इल्हे उपस्थित होते. अत्यंत गरजू मुलीला आधारची मदत झाली. साक्षीला नक्कीच शिक्षणाचे बळ मिळून तिचे उच्च अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ मिळेल.