आयुष्याचे मंदिर करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे माऊलींच्या समाधीस नतमस्तक होत घेतली सदिच्छा भेट*
*आयुष्याचे मंदिर करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे माऊलींच्या समाधीस नतमस्तक होत घेतली सदिच्छा भेट*
प्रतिनिधी आरिफभाई शेख
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज माऊली मंदिरात सदिच्छा भेट घेतली दर्शनासाठी आल्यानंतर माऊलींचे मंदिर न्याहळून पाहताना. अण्णांना जुन्या आठवणी जागृत झाल्याचे भासत होते. मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर त्यांचा शाल श्रीफळ देऊन देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. माऊलींच्या चल प्रादुकांचे मंत्रघोष माऊलींचे पुजारी वेदमूर्ती आनंद जोशी यांनी करत अण्णांचे शुभहस्ते हस्ते माऊलीच्या चल पादुका पूजनही करण्यात आले.त्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांची भेट घेतली.चौथ्या वर्गात शिकणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपले विचार मांडत असताना निष्कलंक चारित्र्य .स्वच्छ जीवन. निस्वार्थ जगत असताना स्वतःच्या आयुष्याचा लोकांना उपयोग व्हावा यासाठी कार्यरत राहण्याचे धडे आपण घ्यावेत अशा भावना समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या.वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर निघताना रस्त्याने चालताना त्यांची नजर एका पैसा नावाच्या कीटकावर पडली. तो पैसा नावाचा कीटक आपल्या पायाखाली जाऊ नये यासाठी त्यांनी स्तब्ध जागेवर उभे राहून हाताने इशारे करत त्या किटकाला बाजूला करण्याचे उंगली निर्देश केले.यातून आजूबाजूचे लोकांना विशेष असा आश्चर्याचा धक्का बसला. वयाच्या 86 वर्षीही इतर जीवाची परवा हे फक्त जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून होऊ शकते. याचीही प्रचिती आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त. आण्णाचे सुरक्षा रक्षक.यांच्या समवेत पायी मंदिरापासून जात असताना. जुन्या काळातील अण्णांच्या उपोषणाने महाराष्ट्र राज्याचे सरकार ढासळल्याचे आपोआप आठवण झाली. अण्णांचे उपोषण.अण्णांची आंदोलने. यामुळे युवक सदैव त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहिला. स्वतःला जमिनीत गाडून घेत कणसाचा एक दाना. हजारो दाने तयार करतो. त्याप्रमाणे स्वतःचे आयुष्य लोकांसाठी खर्च करा हजारोंचे आयुष्य बदलतील ही भावना आजही अण्णांच्या मनी तशीच असलेली दिसून आली.