ग्रामपंचायतच्या वतीने गावात स्वच्छता मोहिम सुरू

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने गावात स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली असून प्रभाग क्रमांक १ पासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
जेसीबीच्या साह्याने स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली असून न्यू इंग्लिश स्कूल व कै. आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय समोरील रस्ता, कामगार तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस परिसरात ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी व रोजंदारीने लावलेले मंजूर व ट्रॅक्टर – ट्राली च्या साह्याने स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता ८ वी ब व ८ वी क तुकडीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव यांनीही स्वच्छता केली.
प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ६ मध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे तसेच शासकिय कार्यालये व धार्मिक स्थळे या ठिकाणीही स्वच्छता मोहिम राबवण्यात येईल तसेच महत्वाच्या ठिकाणी पुन्हा तणनाशक फवारणी करण्यात येईल. ग्रामपंचायत मार्फत डास निर्मूलन फवारणी सुरु करण्यात आलेली असून वाड्या – वस्त्यांवर डास निर्मूलन फवारणीसाठी वाड्या – वस्ती वरील ग्रामस्थांना किटनाशक देण्यात येतील तरी वाड्या – वस्तीवर राहणार्या ग्रामस्थांनी हातपंपाने डास निर्मूलन फवारणी करुन टाकळीभान ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी केले आहे.
स्वच्छता मोहिम शुभारंभ प्रसंगी उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, भाऊसाहेब पटारे, प्रा. जयकर मगर, विलास दाभाडे, मोहन रणनवरे, संजय रणनवरे, अशोक कचे, सुंदर रणनवरे आदी उपस्थित होते.