घूमनदेव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी श्रीपत गायकवाड यांची तर उपसरपंचपदी गीताराम जाधव

घूमनदेव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी श्रीपत गायकवाड यांची तर उपसरपंचपदी गीताराम जाधव
श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घूमनदेव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी श्रीपत रावसाहेब गायकवाड यांची तर उपसरपंचपदी गीताराम भिमाजी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सरपंच यांच्या नावाची सूचना श्री गीताराम जाधव यांनी यांनी केली . यावेळी ग्रा.प. सदस्य हिराबाई शिंदे व सोनल गायकवाड उपस्थित होत्या. तर सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने श्रीपत गायकवाड यांची सरपंच पदी व गीताराम भिमाजी जाधव यांची उपसरपंच पद बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार गावातील पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच बाळकृष्ण कांगुने, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब कांगूने, मा. चेअरमन आबासाहेब कांगुणे, दिलीप शिंदे, बाळासाहेब कांगुणे, हरिभाऊ जाधव सर, भागवत कांगुणे, पंढरीनाथ गायकवाड, सुभाष कांगूने, बाबासाहेब कांगूने, काळू गायकवाड, जयराम गायकवाड, दत्तात्रय वाबळे, रवींद्र शिंदे, बाबासाहेब कोकणे, प्रशांत ओहोळ निवडणूक निर्णय अधिकारी,ग्रामसेवक अशोक विधाटे राजेंद्र मते भैरवनाथ कांगुणे, अशोक गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, सुदाम गायकवाड ,बाळू रजपूत, कर्मचारी कयूम सय्यद, कृष्णा शिरसाठ, अण्णासाहेब जाधव, रामदास कांगुणे, रविंद्र जाधव,मनोज जाधव ,गोकुळ पाचपिंड आसाराम मुठे, बाळासाहेब बनकर सर, मोहन कुमावत आदी उपस्थित होते.