धार्मिक

हिंदू मंदिरांवरील कब्जे हिंदूंवरील अन्याय  बाबत लढतांना  ज्या धर्मरक्षकांवर गुन्हे दाखल होतील त्यांची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय श्रीराम संघ,हिंदुत्ववादी संघटना व संग्राम भैय्या जगताप उचलतील- सागर बेग 

हिंदू मंदिरांवरील कब्जे हिंदूंवरील अन्याय  बाबत लढतांना  ज्या धर्मरक्षकांवर गुन्हे दाखल होतील त्यांची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय श्रीराम संघ,हिंदुत्ववादी संघटना व संग्राम भैय्या जगताप उचलतील- सागर बेग 

 

*राजापूर (प्रतिनिधी):- हिंदू मंदिरांवर कब्जे करून हिंदूंवरच हल्ले करायचे हिंदूंवरच गुन्हे दाखल करायचे असे प्रकार पूर्वी झालेत पण आज हिंदू जागा झाला आहे आजचा हिंदू असे अन्याय कदापिही सहन करणार नाही.हिंदू मंदिरांवरील कब्जे हिंदूंवरील अन्याय अत्याचारा बाबत लढतांना यापुढे ज्या धर्मरक्षकांवर गुन्हे दाखल होतील त्यांची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय श्रीराम संघ, हिंदुत्ववादी संघटना व संग्राम भैय्या जगताप उचलतील अशी ग्वाही राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिली.*

 

राजापूर येथील भगवान सूर्यदेव मंदिरावरील जिहाद्यांचा कब्जा हटवण्यासाठी व त्यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी जगदगुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज नाणीजधाम व अहिल्यानगर चे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूरात भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सागर बेग हे बोलत होते.

 

आपल्या आक्रमक भाषा शैलीत उपास्थित असलेल्या हजारो धर्म बंधू आणि भगिनीं समोर बोलतांना ते पुढे म्हणाले की,खटले दाखल होतील म्हणून आज अनेक धर्म रक्षक धर्म कार्यापासून अलिप्त आहेत त्यांच्या मागे सकल हिंदू समाज आहे त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत बेग पुढे म्हणाले की, छत्रपतींच्या स्वराज्यात महाराजांनी राज्याला साडे तीनशे गड किल्ले दिलेले आहेत तर अनेक मंदिरे देखील त्यांनी जिहाद्यांच्या जोखडातून वाचवलेले आहेत त्या गड किल्ल्यांचे व मंदिरांच्या संवर्धनसाठी आज हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागावे यासारखे दुर्दैव्य नाही. राजापूर मधील सूर्य देव मंदिर बाबत आज ही धर्म सभा घ्यावी लागत आहे आजही आपल्या अनेक मंदिरांवर जिहादी अतिक्रमन मोठ्या प्रमाणावर आहे. राजापूरातील सूर्यदेव मंदिरात होणारी होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होती परंतु 2008 पासून ती बंद करण्यात आली तरी हिंदू शांत आहे ही बाब विचार करायला लावणारी आहे.शांत राहून क्रांती होत नसते त्यासाठी आक्रमक पणा अंगी असावा लागतो आणि तोच हिंदूंमधील आक्रमक पणा काँग्रेसने सत्तर वर्षात काढून घेण्याचे काम केले आहे असे सांगून ते म्हणाले की,प्रत्येक बाब संवैधानिक मार्गाने मिळणे शक्य नसते त्यासाठी लढा हा उभारावाच लागतो अगदी तीच पद्धत राजापूर मधील सूर्यदेव मंदिरा बाबतीत करावी लगणार आहे.

 

सागर बेग याप्रसंगी म्हणाले की, काँग्रेसने हिंदू मंदिरांच्या बाबतीत अनेक अघोरी असे कायदे करून ठेवले आहेत.आज दररोज हजारो हिंदू मुलींचे, परिवारांचे धर्मांतरन होत आहे तर आठशे जिल्ह्यापैकी दोनशे जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झाला आहे तर सहा हजार तालुक्यापैकी दीड हजार तलुक्यामधून हिंदूंचा पूर्णपणे सफाया झाला आहे ही खूप मोठी चिंतेची बाब असून हिंदू कायमचा संपवण्यासाठी अंतरराष्ट्रीय बैठका दररोज होत आहेत.त्यासाठी हिंदूंनी एकजूटता दाखवण्याची गरज असून वेळप्रसंगी आक्रमकता देखील दाखवावी लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले.

 

यावेळी नरेंद्र महाराजांचे व आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे हिंदुत्ववादी विचार हिंदूनीं एकाग्रतेने ऐकले.राजापूर मधील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने या धर्मसभेला उपस्थित होता.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे