गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याकरिता लॉज उपलब्ध करून दिल्या प्रकरणी हॉटेल मालकास अटक 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याकरिता लॉज उपलब्ध करून दिल्या प्रकरणी हॉटेल मालकास अटक 

 

एक दिवस पोलीस कस्टडी

 

राहुरी पोलीस स्टेशन गुरण 917/25 कलम 64(1) Bns सह 4,8,12 posco मध्ये अनिकेत लॉजिग मालक चालक अनिकेत जाधव वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 posco वाढ करून अटक करून त्यास मान्य न्यायालयापुढे पोलीस कस्टडी रिमांड करिता हजर केले असे मान्य न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कस्टडी दिली आहे .

 

तरी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व हॉटेल मालक लॉज चालक यांना राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपणाकडे कुणीही ग्राहक आल्यास त्याचे ओळखपत्र जन्माचा पुरावा घेऊन त्यावर संबंधिताची स्वाक्षरी घेऊन रजिस्टर ला नोंद घ्यावी .

तसेच कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन मुलीसह आलेल्या ग्राहकास हॉटेलमध्ये लॉज मध्ये रूम उपलब्ध करून देऊ नये .

अशाप्रकारे अल्पवयीन मुलीस रूम उपलब्ध करून दिल्यास व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास भारतीय न्याय संहिता कलम 55 तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 17 अन्वये हॉटेल /लॉज मालक चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे  अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे  उपविभागीय पोलीस अधिकारी  जयदत्त भवर  यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व लेखनिक पोलीस हवालदार सतीश आवारे,पोहवा विस्वास बेरड, पोना अशोक कुदळे ,पोशी रवी पवार यांनी केली आहे .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे