अधिकार्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजघटकातील विद्यार्थ्यांना फायदा पोहोचवावा – प्रदीप पवार
अधिकार्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजघटकातील विद्यार्थ्यांना फायदा पोहोचवावा – प्रदीप पवार
उच्च पदस्थ अधिकारपदावर असलेल्या अधिकारी वर्गाने आपल्या ज्ञानाचा समाजघटकातील गरजू विद्यार्थ्यांना फायदा पोहोचवावा जेणेकरून तळागाळातील व उपेक्षित घटकातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन करतील असा आशावाद राहुरी पंचायत समितीचे मा. उपसभापती श्री प्रदीप पवार यांनी व्यक्त केला
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गो संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. दिनकर कांबळे यांनी श्री पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली प्रसंगी त्यांच्या सत्कार प्रसंगी पवार बोलत होते प्रसंगी पत्रकार बाळकृष्ण भोसले, पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर. बबलू कांबळे श्री बाचकर, आदी मान्यवर उपस्थित होते
प्रसंगी डाॅ. कांबळे यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उतरून नकारार्थी न्यूनगंड प्रथम बाजूला करण्याची आवश्यकता आहे विविध सामान्य स्तरातील विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करताना आपण पाहात आहोत त्यासाठी अभ्यासाची दिशा निश्चित केली तर यश आपल्या जवळ असल्याचे सांगत पुढील काळात अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.