येथील वाघजाई नगर मधील वाघजाई देवीची महापूजा संपन्न

राशीन येथील वाघजाई नगर मधील वाघजाई देवीची महापूजा संपन्न
कर्जत प्रतिनिधी – राशीन येथील प्रभाग क्रमांक दोन मधे असलेल्या वाघजाई मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. वाघजाई देवी या भागातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. वाघजाई देवीच्या जुन्या मंदिराचा या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक वर्गणी करून मंदीराचा जिर्णोद्धार केला. व या ठिकाणी नवीन मंदिर बांधकाम करून देवीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ केला . आणि तोच दिवस यापुढे वाघजाई देवीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जाईल असे परिसरातील नागरिकांच्या वतीने ठरविण्यात आले. त्याच माध्यमातून परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन भक्तीमय वातावरणात वाघजाई देवीची महापूजा करण्यात आली यावेळी परिसरातील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.राशीनच्या या वाघजाई देवी मंदिरात वर्षेभर अनेक धार्मिक उत्सव साजरे होतात. परंतु या मंदिरात येण्या जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्धता नाही. याबाबत शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. राशींन ग्राम पंचायतीचा प्रभाग क्रमांक दोन हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे या प्रभागामध्ये अणेक ठिकाणी लोकवस्त्या आहेत. परंतु या ठिकाणाहून मंदिराकडे जाण्या येण्यासाठी कसल्याही प्रकारच्या रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते . सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांना मागील वर्षी अनेक वेळा या रस्त्याबाबत मागणी केली परंतु त्यांनी अद्याप पर्यंत कसलेही लक्ष दिले नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाचे डॉ. विलास राऊत यांनी केला आहे . लवकरच वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रा. राम शिंदे यांना या मंदिराकडे दर्शनास आणून मंदिरासाठी सभा मंडप व राशींच्या प्रभाग क्रमांक दोन मधील रस्त्याची दुरावस्था निदर्शनास आणून देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.