देवळाली प्रवरा सोसायटीच्या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द..*
देवळाली प्रवरा सोसायटीच्या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द..*
देवळाली प्रवरा – देवळाली प्रवरा सोसाटीचे सभासद अरुण ढुस व कारभारी वाळुंज यांनी सहकारी संस्था अधिनियम व पोट नियमातील तरतुदीचा आधार घेऊन १० गुंठे व त्या पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सभासदांना संस्थेचे सभासद राहता येत नाही या तरतुदीचा आधार घेऊन त्या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द करणेसाठी राहुरीचे सहा निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दिलेल्या तक्रारी वरून देवळाली सोसाटीच्या त्या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे.
सहा. निबंधक सहकारी संस्था राहुरी यांनी दि. ७ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ आणि २५ अ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारा नुसार मी दीपक नागरगोजे, सहा. निबंधक, सहकारी संस्था राहुरी जि. अहमदनगर पुढीलप्रमाणे आदेश देतो की, देवळाली प्रवरा विविध कार्य. सेवा सह संस्था मर्या. ता. राहुरी या संस्थेचे पुढील १ ते १८४ सभासद अधिनियमा नुसार आणि संस्थेच्या उपविधि नुसार सभासदत्वासाठी आवकश्यक ती पात्रता धारण करीत नाहीत. त्यामुळे अधिनियमातील तरतुदीनुसार कलम २५ अ नुसार संस्थेच्या सभासद नोंद वहितुन १८४ सभासदांची नावे कमी करण्याचे निदेश देत आहे.
सोसाटीचे सत्ताधारी गटातील त्या ५९ सभासदांना दोन पैकी एका संस्थेत राजीनामा देणेचा निकाल ताजा असतानाच या १८४ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयामुळे देवळाली प्रवरा सोसायटी वर्तुळात खळबळ उडाली असून लवकरच होणाऱ्या निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.