मानोरीत बिबट्याची दहशत कायम सुरूच

मानोरीत बिबट्याची दहशत कायम सुरूच
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे बिबट्याची दहशत कायम सुरू असून शनिवारी पहाटे तीन वाजे दरम्यान मानोरी येथील पोपट साहेबराव कारंडे यांच्या सहा फूट शेडच्या भिंतीवर चढून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला त्यावेळी चार शेळ्या फस्त करून दोन शेळ्या जखमी केल्या मानोरी गणपत वाडी रोड येथे राहणारे पोपट साहेबराव कारंडे गट नंबर ३०५ एक मध्ये राहत आहेत ते राहत असलेल्या घरासमोरील शेडमध्ये बांधलेल्या चार शेळ्या फस्त केल्या तर दोन शेळ्या जखमी केल्या हा सर्व थरार शनिवारी पहाटे तीन वाजे दरम्यान सुरू होता शेळ्या का ओरडतात म्हणून साहेबराव कारंडे हे घरातून बाहेर आले समोर शेडमध्ये चार शेळ्या बिबट्याने फस्त केलेल्या होत्या तर दोन शेळ्या जखमी केलेल्या अवस्थेत दिसून आल्या या घटनेची माहिती
सकाळी गावात समजतात घटनास्थळी मानोरी सोसायटीचे चेअरमन शरद राव पोटे मानोरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अण्णासाहेब तोडमल सुधाकर भिंगारे पप्पू भिंगारे सोमनाथ गीते आबासाहेब सपकाळ यांनी परिस्थितीची पाहणी केली त्याचवेळी संबंधित वनाधिकारी यांना दूरध्वनी केल्यानंतर त्याच दिवशी सकाळी दहा वाजता वन अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले वन क्षेत्रपाल पाचारणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रायकर साहेब वनरक्षक एस एस जाधव साहेब वन कर्मचारी सिनारे साहेब शेळके साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा केला मानोरी गाव तसेच परिसरामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे या बिबट्याच्या हल्ल्यात मानोरी गावातील पंधराहून अधिक शेळ्या मेंढ्या बोकड या बिबट्याची शिकार बनले असून या बिबट्याचा वन खात्याने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे मानोरी परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून पाच बिबटे मादी व पिल्लासह वावरत आहे गणपतवाडी खेळे वस्ती जाधव वस्ती साळुंके वस्ती पठाण वस्ती वळण शिवरस्ता राहुरी मांजरी रस्ता या सर्व परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे पाऊस सुरू असल्यामुळे सर्व शेतात पाणी व चिखल असल्याकारणामुळे बिबट्या हा चिखलातून शेतात न वावरता तो आत्ता हळूहळू मानवी वस्तीकडे वळालेला दिसून येत आहे प्राण्यांबरोबर बिबट्या आता मानवी हल्ला ही करू शकतो
अशी भीती शेतकरी वर्गामध्ये पसरली आहे शाळेत जाणारे मुले मुली दूध उत्पादक शेतकरी यांच्यात मोठ घबराटीचे वातावरण तयार झालेलं दिसतं तरी राहुरी येथील वन खात्याने मानोरी परिसराचा गांभीर्याने विचार करावा कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही लवकरात लवकर बिबट्या ज्या परिसरामध्ये वावरत आहे तेथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व पिंजरा लावून बिबट्या मादी पिल्लासह जेरबंद करा अशी मागणी मोठ्या प्रमाणातून शेतकरी वर्गातून केली जात आहे