अपघात

त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे काळाच्या पडद्याआड 

त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे काळाच्या पडद्याआड 

नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते संस्थेच्या कामानिमित्त मंगळवारी (ता.१०) मुंबईला मंत्रालयात गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. साहेबराव घाडगे यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
त्रिमूर्ती संकुलात अंत्यसंकार*
घाडगे पाटील यांच्या पार्थिवावर आज (दि. ११) सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती संकुलात अंत्यसंकार होणार आहेत, असे शैक्षणिक संकुलाच्या पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुली, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे